
दुबई: यूएईने(uae) न्यूझीलंडला (new zealand) हरवत टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला. दुबईत खेळवण्यात आलेल्या यूएई आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात यूएईने ७ विकेटनी विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. पहिल्यांदा फलंदाजी करताना किवी संघाने ८ बाद १४२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यूएईने ३ बाद १४४ धावा करत मोठा उलटफेर केला.
टॉस जिंकत यूएईने न्यूझीलंडच्या संघाला फलंदाजीला बोलावले. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. टीम सायफर्ट ७ आणि मिचेल सँटनर १ धावा करून बाद झाला. न्यूझीलंडची गळती इथेच थांबली नाही. क्लिव्हरला खातेच खोलता आले नाही. बोवेज २१ धावा करून बाद झाला.
एकीकडे सातत्याने विकेट जात असताना दुसरीकडे चॅपमॅनने कमान सांभाळली. त्याने क्रीजच्या एका बाजूने लढा देत संघाला संकटातून बाहेर काढण्याचे काम केले. जेम्स नीशामने २१ धावांची खेळी केली. चॅपमॅन शेवटपर्यंत क्रीजवर होता आणि त्याने ४६ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६३ धावा करून बाद झाला. न्यूझीलंडची धावसंख्या ८ बाद १४२ इतकी झाली.
HISTORIC MOMENT IN UAE CRICKET...!!!
Defeated New Zealand for the first time in International cricket. pic.twitter.com/ueXztz1QbS
— Johns. (@CricCrazyJohns) August 19, 2023
प्रत्युत्तरादाखल खेळताना यूएईची सुरुवात खराब झाली. पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा आर्यंश शर्मा खाते न खोलताच बाद झाला. वृत्य अरविंदने काही चांगले शॉट खेळले मात्र तोही २५ धावांवर बाद झाला. वसीमने चांगली फलंदाजी करताना अर्धशतक ठोकले. मात्र सँटनरने त्याला बाद केले.
येथून आसिफ खानने तुफानी फलंदाजी केली आणि २९ बॉलमध्ये नाबाद ४८ धावा केल्या. त्यासोबतच बासिल हमीदने नाबाद १२ धावा करत यूएईला १६व्या ओव्हरमध्ये ७ विकेटनी विजय मिळवून दिला. यासोबतच यूएईने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला. यूएईने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडला पहिल्यांदा हरवले.