Satellite images : उपग्रह छायाचित्रे

Share
  • कथा : प्रा. देवबा पाटील

प्रत्येक उपग्रहावर काही कॅमेरे बसवलेले असतात. त्यांच्या साहाय्याने तो उपग्रह संपूर्ण पृथ्वीचे एकाच वेळी व सतत निरीक्षण करू शकतो. तसेच पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांचेही त्याला सखोल निरीक्षण करता येते. उपग्रहाने काढलेल्या छायाचित्रांचे रेडिओ लहरींमध्ये रूपांतर केले जाते. पृथ्वीवर या रेडिओ लहरींचे पुन्हा मूळ छायाचित्रात रूपांतरण केले जाते.

दीपा आणि संदीप ही जिज्ञासू व हुशार भावंडे यक्षाच्या यानात बसून अवकाश सफर करीत होते. त्यावेळी त्यांची नजर संगणकावर दिसलेल्या एका ग्रहाकडे गेली. त्यांना तो ग्रह पृथ्वीसारखाच वाटला. ते बघून “एखाद्या कृत्रिम उपग्रहावरून संपूर्ण पृथ्वी कशी काय दिसते?” दीपाने यक्षाला प्रश्न केला.

“कोणताही उपग्रह हा पृथ्वीपासून किमान ३५००० कि.मी. दूरवर असावा लागतो, तेव्हाच एकाच वेळी त्याची नजर संपूर्ण पृथ्वीवर पडू शकते. कमी उंचीवर असणा­ऱ्या उपग्रहांना निम्नस्तरीय पृथ्वीय कक्षा उपग्रह म्हणतात. ते दिवसातून एक किंवा जास्त वेळाही पृथ्वीला प्रदक्षिणा घालतात. टेहळणी करण्यासाठी सहसा ते वापरतात. पृथ्वीवरच्या कोणत्याही ठिकाणी वाहतुकीला मदत करणारे उपग्रह हे मध्यम उंचीवर असतात. त्यांना मध्यमस्तरीय पृथ्वीय कक्षा उपग्रह म्हणतात. हवामानाच्या अंदाजासाठी, दूरदर्शनच्या कार्यक्रमांच्या प्रसारणासाठी, मोबाइलच्या संदेशवहनासाठी व इंटरनेटसाठी ज्या उपग्रहांचा वापर करतात, ते भूस्थिर उपग्रह असतात. हे पृथ्वीपासून ३५००० कि.मी.पेक्षा जास्त अंतरावर असतात. त्यांना उच्चस्तरीय पृथ्वीय कक्षा उपग्रह म्हणतात. प्रत्येक उपग्रहाची पृथ्वीपासून उंची व भ्रमणकक्षा वेगवेगळी असते.” यक्षाने स्पष्टीकरण दिले.

“त्याची नजर कशी असते?” संदीपने प्रश्न केला.

यक्ष म्हणाला, “त्याची नजर म्हणजे त्याचे अत्यंत उच्च प्रतीचे व आधुनिक तंत्रज्ञानाचे शक्तिशाली कॅमेरे असतात. प्रत्येक उप्रगहावर काही कॅमेरे बसवलेले असतात. त्यांच्या साहाय्याने तो उपग्रह संपूर्ण पृथ्वीचे एकाच वेळी व सतत निरीक्षण करू शकतो. तसेच ते कॅमेरे फिरवून पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांचेही त्याला सखोल व सविस्तर निरीक्षण करता येते.

“उपग्रहाने घेतलेली छायाचित्रे पृथ्वीवर कशी पाठवतात?” दीपाने विचारले.

“उपग्रहावरील उच्च दर्जाच्या कॅमे­ऱ्यांच्या साहाय्याने आवश्यक त्या भागांचे फोटो काढले जातात. त्या छायाचित्रांचे रेडिओ लहरींमध्ये रूपांतर केले जाते. ते रेडिओ लहरींच्या रूपातील छायाचित्र पृथ्वीवर प्रक्षेपित केले जाते. पृथ्वीवर या रेडिओ लहरींचे पुन्हा मूळ छायाचित्रात रूपांतरण केले जाते. या सर्व गोष्टींसाठी अतिशय उच्च प्रतीची इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणे वापरली जातात,” यक्षाने सांगितले.

“मग त्या उडत्या तबकड्या काय असतात?” संदीपने विचारले.

यक्ष म्हणाला, “उडत्या तबकड्या म्हणजे परग्रहावरील सजीवांचे एका ग्रहावरून दुस­ऱ्या ग्रहावर जाण्याचे वाहन आहे व त्यात बसून ते सजीव ये-जा करतात असे म्हणतात; परंतु त्यांचे अस्तित्व अजून तर काही सिद्ध झालेले नाही.”

“यक्ष दादा आज जरा आम्हाला थकल्यासारखे वाटत आहे. तर आजची ही चर्चा आपण थंबवू या.” दीपा यक्षाला म्हणाली.

“अरे घाबरू नका. आपण तर चर्चा आता जरूर थांबवू. मी तुम्हाला खास ऊर्जा पुरवणारे द्रवान्न देतो. ते आपण सारे मिळून पिऊ. तुमचा थकवा निघून जाईल. मग आपण सारे आराम करू.” यक्ष म्हणाला व यानाच्या आतल्या कक्षात गेला.

आतून त्याने एक काचेची बाटली व तीन वाट्या आणल्यात. त्याने त्या काचेसारख्या बाटलीतील द्रव पदार्थ त्या वाट्यांमध्ये टाकला व एकेक वाटी या बहीण-भावांच्या हाती दिली व एक त्याने घेतली. मग सा­यांनी तो द्रव पियाली आणि खरोखरच त्यांचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. मग यक्षाने सांगितल्याप्रमाणे ते यानाच्या एका कक्षात आराम करू लागले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Jio युजर्सला हवे Unlimited 5G डेटा, इतके रुपयांचा करावा लागेल रिचार्ज

मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…

4 hours ago

IND vs ZIM: अभिषेक-गायकवाडचे वादळ, आवेश-मुकेशचा कहर, झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले

मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…

6 hours ago

१००० कोटीहून अधिक नेटवर्थ…क्रिकेटच नव्हे तर बिझनेसमध्येही हिट धोनी

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…

6 hours ago

Tomato Price Hike : टोमॅटोची ‘लाली’ आणखी वाढणार

नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…

9 hours ago

Ashadhi Ekadashi : आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद!

दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…

9 hours ago

ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी FSSAI ची नवी नियमावली!

आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…

9 hours ago