Luna 25: लँडिंगआधीच अडचणीत आले रशियाचे लूना २५ मिशन!

  376

मुंबई:भारताच्या 'चांद्रयान ३'(chandrayaan 3) सोबतच रशियाचे 'लूना २५' (luna 25) हे यानही चंद्रावर उतरण्यासाठी पुढे पुढे सरकत आहे. दरम्यान, शनिवारी १९ ऑगस्टला लूना २५मध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्यासमोर संकट उभे ठाकले आहे. रशियाच्या अंतराळ संशोधन संस्था रोकोस्मॉसने ( Roscosmos) म्हटले की चंद्रावर उतरण्याआधी लूना २५ च्या तपासणीदरम्यान एका इर्मजन्सीची माहिती दिली.


'लूना २५' हे यान २१ ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरत आहे. रशियाच्या अंतराळ संस्थेने सांगितले की आज दुपारी लँडिंगआधीच्या कक्षेत पाठवण्यासाठी थ्रस्ट जारी करण्यात आले होते. या दरम्यान ऑटोमॅटिक स्टेशनवर इर्मजन्सी स्थिती निर्माण झाली आणि या कारणामुळे मिशनचे मॅन्यूव्हर पूर्ण होऊ शकले नाही.



११ ऑगस्टला केले लाँच


रशिया गेल्या ५० वर्षांमध्ये पहिल्यांदा असे मिशन करत आहे. रशियाचे हे यान ११ ऑगस्टला लाँच करण्यात आले होते. लूना २५ ने बुधवारी यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.



'लूना २५'च्या लँडिंगमध्ये उशीर होणार?


या घटनेने 'लूना २५' यानाच्या दक्षिण ध्रुवावर होणाऱ्या लँडिंगवर परिणाम होणार की नाही याबाबत रोकोस्मोसने कोणतीही माहिती दिलेली नाही. रशियाचे हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर एक वर्ष राहण्याची आशा आहे यात तेथील नमुने एकत्र करणे आणि मातीचा अभ्यास करणे हे काम करणार आहे.



चांद्रयान ३ ही चंद्राच्या जवळ


भारताचे चांद्रयान ३ ही चंद्राच्या अतिशय जवळ पोहोचले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने शुक्रवारी सांगितले होते की चांद्रयान ३ ने लँडर मॉड्यूलला चंद्राच्या जवळ जाणारी डिबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली असून याची स्थिती सामान्य आहे. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ ऑगस्टला सॉफ्ट लँडिंग करण्याची आशा आहे.

Comments
Add Comment

येमेनजवळ मोठी दुर्घटना, आफ्रिकन स्थलांतरितांची बोट बुडाली, ६० हून अधिक जणांचा मृत्यू

सना, येमेन: येमेनच्या किनाऱ्यावर रविवारी एक भीषण बोट दुर्घटना घडली, ज्यात ६० हून अधिक आफ्रिकन स्थलांतरितांचा

भूकंपानंतर आता रशियात ज्वालामुखीचा उद्रेक! राखेचे लोट ६,००० मीटर उंचीपर्यंत

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा

पाकिस्तानात ५.१ रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये रविवारी (३ ऑगस्ट) भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. पाकिस्तानच्या नॅशनल

'भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही...' डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आता रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवू शकतो,

२५% ट्रम्प टॅरिफचा धोका टळला! एक आठवड्यासाठी दिलासा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली होती, जी १

ट्रम्प यांनी ४१ टक्क्यांपर्यंत लावला टॅरिफ, आदेशावर केली स्वाक्षरी, भारतासह ७० देशांवर होणार परिणाम

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेताना यांनी अनेक देशांच्या वस्तूंवर १० ते ४१