Thursday, July 18, 2024
Homeमहत्वाची बातमीLuna 25: लँडिंगआधीच अडचणीत आले रशियाचे लूना २५ मिशन!

Luna 25: लँडिंगआधीच अडचणीत आले रशियाचे लूना २५ मिशन!

मुंबई:भारताच्या ‘चांद्रयान ३'(chandrayaan 3) सोबतच रशियाचे ‘लूना २५’ (luna 25) हे यानही चंद्रावर उतरण्यासाठी पुढे पुढे सरकत आहे. दरम्यान, शनिवारी १९ ऑगस्टला लूना २५मध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्यासमोर संकट उभे ठाकले आहे. रशियाच्या अंतराळ संशोधन संस्था रोकोस्मॉसने ( Roscosmos) म्हटले की चंद्रावर उतरण्याआधी लूना २५ च्या तपासणीदरम्यान एका इर्मजन्सीची माहिती दिली.

‘लूना २५’ हे यान २१ ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरत आहे. रशियाच्या अंतराळ संस्थेने सांगितले की आज दुपारी लँडिंगआधीच्या कक्षेत पाठवण्यासाठी थ्रस्ट जारी करण्यात आले होते. या दरम्यान ऑटोमॅटिक स्टेशनवर इर्मजन्सी स्थिती निर्माण झाली आणि या कारणामुळे मिशनचे मॅन्यूव्हर पूर्ण होऊ शकले नाही.

११ ऑगस्टला केले लाँच

रशिया गेल्या ५० वर्षांमध्ये पहिल्यांदा असे मिशन करत आहे. रशियाचे हे यान ११ ऑगस्टला लाँच करण्यात आले होते. लूना २५ ने बुधवारी यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.

‘लूना २५’च्या लँडिंगमध्ये उशीर होणार?

या घटनेने ‘लूना २५’ यानाच्या दक्षिण ध्रुवावर होणाऱ्या लँडिंगवर परिणाम होणार की नाही याबाबत रोकोस्मोसने कोणतीही माहिती दिलेली नाही. रशियाचे हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर एक वर्ष राहण्याची आशा आहे यात तेथील नमुने एकत्र करणे आणि मातीचा अभ्यास करणे हे काम करणार आहे.

चांद्रयान ३ ही चंद्राच्या जवळ

भारताचे चांद्रयान ३ ही चंद्राच्या अतिशय जवळ पोहोचले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने शुक्रवारी सांगितले होते की चांद्रयान ३ ने लँडर मॉड्यूलला चंद्राच्या जवळ जाणारी डिबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली असून याची स्थिती सामान्य आहे. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ ऑगस्टला सॉफ्ट लँडिंग करण्याची आशा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -