Luna 25 failed : रशियाची चांद्रमोहिम अपयशी! लूना २५ चंद्रावर कोसळलं

आता भारताच्या मोहिमेकडे अवघ्या जगाचं लक्ष...


मुंबई : रशियाच्या अंतराळ संशोधन संस्था रोस्कॉसमॉसने (Roscosmos) रशियाची चांद्रमोहिम (Russia moon mission) अपयशी ठरल्याची अधिकृत बातमी दिली आहे. अनियंत्रित कक्षेत फिरल्यानंतर रशियाचे लुना २५ (Luna 25) अंतराळ यान चंद्रावर कोसळलं आहे. रशियाचं लुना २५ अंतराळयान २१ ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार होतं, परंतु त्यापूर्वीच तांत्रिक समस्या उद्भवल्याने ते चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश झालं. गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच अशा पद्धतीचे मिशन करणार्‍या रशियासाठी ही खूप धक्कादायक बाब आहे.


रशियन अंतराळ संशोधन संस्था रोस्कॉसमॉसने अधिकृतरित्या सांगितलं आहे की, अनियंत्रित कक्षेत फिरल्यानंतर रशियाचे लुना २५ अंतराळ यान चंद्रावर कोसळलं आहे. रोस्कोसमॉसने सांगितलं की, लुना २५ ला प्री-लँडिंग ऑर्बिटमध्ये असताना शंटिंग करण्यात तांत्रिक समस्या उद्भवली होती. यानंतर पुन्हा प्रयत्न करताना लूनाचं लँडर चंद्राच्या अनियोजित कक्षेत पोहोचलं. यानंतर लँडरचा ताबा सुटला आणि ते चंद्रावर क्रॅश झालं.


रोस्कॉसमॉस मधील वैज्ञानिक सातत्याने लँडरचा शोध घेण्याचा आणि त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या प्रयत्नांना यश मिळालं नाही. अखेर ही मोहीम अयशस्वी झाल्याचं रॉस्कॉस्मॉसने आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवरून स्पष्ट केलं. रोस्कोसमॉसने एका निवेदनात म्हटलं आहे की, "लुना २५ नियोजित कक्षेत न जाता वेगळ्या अनियंत्रित कक्षेत गेले आणि त्याची चंद्राच्या पृष्ठभागाशी टक्कर झाली. यामुळे ही मोहिम अयशस्वी ठरली."



४७ वर्षांनंतर प्रयत्न


१९७६ साली पार पडलेल्या लूना २४ या मोहीमेनंतर तब्बल ४७ वर्षांनी रशियाने ही चांद्रमोहीम राबवली होती. यामुळेच लूना २५ कडून रशियाला मोठ्या आशा होत्या. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचं अस्तित्व शोधून, त्याठिकाणी पुढील एक वर्षांपर्यंत संशोधन करण्याच्या उद्देश्याने लूना २५ चं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. यानाच्या हलक्या वजनाच्या डिझाईन आणि इंधन साठवणुकीच्या क्षमतेमुळे कमी वेळेत हे यान चंद्राच्या कक्षात पोहचलं होतं. मात्र, चंद्र मोहिम पूर्ण होण्याच्या आधीच हे अंतराळयान क्रॅश झालं.



भारताच्या मोहिमेकडे अवघ्या जगाचं लक्ष...


भारताचे चांद्रयान ३ ही चंद्राच्या अतिशय जवळ पोहोचले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने शुक्रवारी सांगितले होते की चांद्रयान ३ ने लँडर मॉड्यूलला चंद्राच्या जवळ जाणारी डिबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली असून याची स्थिती सामान्य आहे. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ ऑगस्टला सॉफ्ट लँडिंग करण्याची आशा आहे. रशिया आणि भारत दोन्ही देश दोन दिवसांच्या अंतराने चंद्रावर उतरणार होते. आता रशियाचं लुना २५ क्रॅश झाल्यानंतर जगाचं लक्ष भारताच्या चंद्र मोहिमेकडे लागलं आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

PM Modi SCO Summit : बिश्केकमध्ये पंतप्रधान मोदींची पुतीन, पेझेश्कियन यांच्याशी भेट; वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थिती

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचा पलटवार; जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, होर्मुजमध्ये तणाव वाढला

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी

Switzerland Rave Shooting : स्वित्झर्लंडमध्ये रेव्ह पार्टीत अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

बर्न : स्वित्झर्लंडमधील आराऊ शहरात रविवारी पहाटे रेव्ह पार्टीदरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एका

Quetta Gurdwara Demolition : बलुचिस्तानात ऐतिहासिक गुरुद्वारा पाडला, शीख समाजात संताप; भारतातूनही तीव्र विरोध

क्वेटा : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे असलेले सुमारे २०० वर्षे जुने ऐतिहासिक श्री

PM Narendra Modi Uzbekistan Visit : भारत-उझबेकिस्तान संबंधांना व्यापक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा देण्याची घोषणा

ताश्कंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्ज़ियोयेव यांच्यासोबत