मुंबई : रशियाच्या अंतराळ संशोधन संस्था रोस्कॉसमॉसने (Roscosmos) रशियाची चांद्रमोहिम (Russia moon mission) अपयशी ठरल्याची अधिकृत बातमी दिली आहे. अनियंत्रित कक्षेत फिरल्यानंतर रशियाचे लुना २५ (Luna 25) अंतराळ यान चंद्रावर कोसळलं आहे. रशियाचं लुना २५ अंतराळयान २१ ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार होतं, परंतु त्यापूर्वीच तांत्रिक समस्या उद्भवल्याने ते चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश झालं. गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच अशा पद्धतीचे मिशन करणार्या रशियासाठी ही खूप धक्कादायक बाब आहे.
रशियन अंतराळ संशोधन संस्था रोस्कॉसमॉसने अधिकृतरित्या सांगितलं आहे की, अनियंत्रित कक्षेत फिरल्यानंतर रशियाचे लुना २५ अंतराळ यान चंद्रावर कोसळलं आहे. रोस्कोसमॉसने सांगितलं की, लुना २५ ला प्री-लँडिंग ऑर्बिटमध्ये असताना शंटिंग करण्यात तांत्रिक समस्या उद्भवली होती. यानंतर पुन्हा प्रयत्न करताना लूनाचं लँडर चंद्राच्या अनियोजित कक्षेत पोहोचलं. यानंतर लँडरचा ताबा सुटला आणि ते चंद्रावर क्रॅश झालं.
रोस्कॉसमॉस मधील वैज्ञानिक सातत्याने लँडरचा शोध घेण्याचा आणि त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या प्रयत्नांना यश मिळालं नाही. अखेर ही मोहीम अयशस्वी झाल्याचं रॉस्कॉस्मॉसने आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवरून स्पष्ट केलं. रोस्कोसमॉसने एका निवेदनात म्हटलं आहे की, “लुना २५ नियोजित कक्षेत न जाता वेगळ्या अनियंत्रित कक्षेत गेले आणि त्याची चंद्राच्या पृष्ठभागाशी टक्कर झाली. यामुळे ही मोहिम अयशस्वी ठरली.”
१९७६ साली पार पडलेल्या लूना २४ या मोहीमेनंतर तब्बल ४७ वर्षांनी रशियाने ही चांद्रमोहीम राबवली होती. यामुळेच लूना २५ कडून रशियाला मोठ्या आशा होत्या. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचं अस्तित्व शोधून, त्याठिकाणी पुढील एक वर्षांपर्यंत संशोधन करण्याच्या उद्देश्याने लूना २५ चं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. यानाच्या हलक्या वजनाच्या डिझाईन आणि इंधन साठवणुकीच्या क्षमतेमुळे कमी वेळेत हे यान चंद्राच्या कक्षात पोहचलं होतं. मात्र, चंद्र मोहिम पूर्ण होण्याच्या आधीच हे अंतराळयान क्रॅश झालं.
भारताचे चांद्रयान ३ ही चंद्राच्या अतिशय जवळ पोहोचले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने शुक्रवारी सांगितले होते की चांद्रयान ३ ने लँडर मॉड्यूलला चंद्राच्या जवळ जाणारी डिबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली असून याची स्थिती सामान्य आहे. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ ऑगस्टला सॉफ्ट लँडिंग करण्याची आशा आहे. रशिया आणि भारत दोन्ही देश दोन दिवसांच्या अंतराने चंद्रावर उतरणार होते. आता रशियाचं लुना २५ क्रॅश झाल्यानंतर जगाचं लक्ष भारताच्या चंद्र मोहिमेकडे लागलं आहे.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…