Tuesday, May 13, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Chandrayaan-3: चंद्रापासून केवळ २५ किमी दूर आहे 'चांद्रयान ३', आता लँडिंगची प्रतीक्षा

Chandrayaan-3: चंद्रापासून केवळ २५ किमी दूर आहे 'चांद्रयान ३', आता लँडिंगची प्रतीक्षा

नवी दिल्ली: Chandrayaan-3 चे विक्रम लँडर आज २० ऑगस्टला सकाळी २ ते ३ वाजल्यादरम्यान चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले आहे. आता हे लँडर २५ किमी x १३५ किमी च्या कक्षेत आहे. आधी ते ११३ किमी x १५७ किमीच्या कक्षेत होते. म्हणजेच आता चंद्राच्या पृष्ठभागापासून विक्रम लँडर केवळ २५ किमी दूर आहे. आता केवळ २३ तारखेला यशस्वी लँडिंगची प्रतीक्षा आहे.


दुसरीकडे रशियाचे बहुचर्चित लुना २५ या यानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आहे. रशियाची अंतराळ संस्था यानाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान रशियाच्या या यानात जर काही बिघाड झाला तर चांद्रयान ३च्या आधी ते चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करू शकणार नाही. त्यामुळे चांद्रयान ३ ला ही संधी मिळू शकते.


 


चांद्रयान ३ च्या विक्रम लँडरने १७ ऑगस्ट २०२३ला प्रोपल्शन मॉड्यूल सोडले होते. ते पुढे निघून गेले होते. त्याने दुसरा मार्ग धरला होता. या रस्त्याने ते चंद्राच्या अधिक जवळ पोहोचले आहे. १८ ऑगस्टच्या दुपारी विक्रम लँडर आणि प्रोपल्शन मॉड्यूल १५३ किमी x १६३ किमीच्या कक्षेत होते. मात्र ४ वाजण्याच्या सुमारास दोघांचे रस्ते बदलले.


यानंतर विक्रम लँडर ११३ किमी x १५७ किमीच्या कक्षेत आले. हे अंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ ११३ किमी होते. म्हणजेच विक्रम ११३ किमी असलेल्या पेरील्यून आणि १५७ किमीच्या एपोल्यूनमध्ये होता. पेरील्यून म्हणजेच चंद्राच्या पृष्ठभागापासून कमी दूर. अॅपोल्यून म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागापासून अधिक दूर.


सध्याच्या घडीला विक्रम लँडर उलट्या दिशेने फिरत आहे म्हणजेच रेट्रोफायरिंग करत आहे. विक्रम लँडर आता आपली उंची कमी करण्यासोबतच गतीही कमी करत आहे. आधीपासून हीच तयारी करण्यात आली होती की २० ऑगस्टच्या रात्री होणाऱ्या डिबूस्टिंगनंतर विक्रम लँडर चंद्रापासून केवळ २४ ते ३० किमी अंतरावर पोहोचेल.

Comments
Add Comment