मुंबई: ५० दिवसांपूर्वी थिएटरमध्ये केदार शिंदे (kedar shinde) दिग्दर्शित बाईपण भारी देवा (baipan bhari deva) हा सिनेमा आला. ना मोठी स्टारकास्ट ना खूप काही बजेट. मात्र गेल्या ५० दिवसांपासून हा सिनेमा थिएटरमध्ये दणक्यात सुरू आहे. या सिनेमाने न भूतो न भविष्यती अशी कामगिरी केली आहे. या सिनेमाने तब्बल ७५ कोटींचा टप्पा पार केला आहे.
सध्याच्या काळात छोट्या बजेटचे सामने १५ दिवसही थिएटरमध्ये टिकू शकत नाहीत. मात्र बाईपण भारी देवा हा सिनेमा गेल्या ५० दिवसांपासून थिएटरमध्ये मोठ्या गर्दीत सुरू आहे. हा सिनेमा ६ बायकांची कहाणी सांगणार आहे. यात कोणताही पुरुष अभिनेता मुख्य भूमिकेत नाही. बायकांना आपला असा वाटणारा हा सिनेमा आहे. या सिनेमाचे सातव्या आठवड्यातील आकडेवारी समोर आली आहे.
बजेटच्या तुलनेत १५ पट अधिक कमाई
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शने या सिनेमाच्या ७व्या आठवड्याचे कलेक्शन शेअर केले आहेत. सोबतच हा सिनेमा ऑल टाईम ब्लॉकबस्टर असल्याचे सांगितले आहे. या सिनेमाने पहिल्या आठवड्यात १२.५० कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यात २४.८५ कोटींची कमाई केली. तिसऱ्या आठवड्यात २१.२४ कोटी, चौथ्या आठवड्यात ९.७२ कोटी, पाचव्या आठवड्यात ४.१४ कोटी, सहाव्या आठवड्यात २.२५ कोटी आणि सातव्या आठवड्यात सिनेमाने १.३५ कोटींची कमाई केली आहे. यासोबतच या सिनेमाने आतापर्यंत ७६.०५ कोटींची कमाई केली आहे.
View this post on Instagram
किती होते सिनेमाचे बजेट
या सिनेमाच्या बजेटबाबत बोलायचे झाल्यास केवळ ५ कोटींमध्ये हा सिनेमा बनला होता. या सिनेमाने आतापर्यंत बजेटच्या १५ पट अधिक कमाई केली आहे.