Sunday, October 26, 2025
Happy Diwali

उत्तराखंडमध्ये भाविकांची बस दरीत कोसळली, ६ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये भाविकांची बस दरीत कोसळली, ६ जणांचा मृत्यू

डेहराडून: उत्तराखंडच्या(uttarakhand) गंगोत्री हायवेवर (gangotri highway) रविवारी एक मोठा अपघात (accident) झाला. येथील गंगोत्री राष्ट्रीय राजमार्गावर गंगनानी जवळ प्रवाशांनी भरलेली एक प्रवासी बस अपघातग्रस्त झाली. अपघातानंतर ही बस दरीत कोसळली. यात ६ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर अनेक जण जखमी झालेत. अपघाताच्या वेळेस बसमध्ये ३५ प्रवासी प्रवास करत होते. अपघातस्थळी बचावकार्य सुरू आहे.

दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास झाला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, बस क्रमांक (UK 07 8585) गंगोत्रीमधून उत्तरकाशीच्या दिशेने जात होती. दुपारी ३ वाजण्याच्या सुमार जसे ही बस गंगोत्री हायवेवर गंगनानी जवळ पोहोचली तेव्हा ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि बस दरीत कोसळली. अपघातानंतर जोरात किंकाळ्या सुरू होत्या. तातडीने जिल्हा प्रशासनाला याची सूचना देण्यात आली.

जिल्हा आपात्कालीन प्रबंधानुसार १९ लोकांना बाहेर काढण्यात आले. जखमींना उपचारासाठी १०८ अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बसमध्ये एकूण ३० ते ३५ प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला तर १९ लोकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Comments
Add Comment