Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाजय शाह जाणार पाकिस्तानला? पीसीबीचे शाहांना आमंत्रण...

जय शाह जाणार पाकिस्तानला? पीसीबीचे शाहांना आमंत्रण…

Pakistan invited Jay Shah: आशिया कप २०२३ सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये ३० ऑगस्टपासून या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ‘बीसीसीआय’ सचिव जय शाह यांना आशिया कप २०२३ चा उद्घाटन सामना पाहण्यासाठी आमंत्रण पाठवले आहे. सध्या ही बातमी चर्चेत आहे.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जय शाह यांना पाकिस्तानात येण्याचे आमंत्रण पाठवले आहे. ‘पीसीबी’ने सांगितले की, शाह व्यतिरिक्त त्यांनी उद्घाटन सामन्यासाठी एसीसीशी संबंधित अनेक बोर्ड अधिका-यांना आमंत्रणे पाठवली आहेत. सूत्रांवर विश्वास ठेवला. तर शाह यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे, परंतु ते पाकिस्तानात जाण्याची शक्यता फारच कमी आहे.

पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी डरबन येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत जय शाह यांना पाकिस्तानला भेट देण्याचे तोंडी निमंत्रण दिले होते. यानंतर आता मंडळाने शहा यांना औपचारिक निमंत्रण पाठवले आहे. शाह यांनी पीसीबीचे निमंत्रण स्वीकारल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले होते, परंतु बीसीसीआय सचिवांनी हा दावा फेटाळून लावला होता. पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले की, “जय शाह यांनी झका अश्रफचे आमंत्रण स्वीकारले असल्याची बातमी पाकिस्तानी मीडियामध्ये फिरू लागली, परंतु भारतीय बोर्डाच्या अधिकाऱ्याने ते स्पष्टपणे नाकारले.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -