निर्माते मंगेश देसाई यांनी केला अनेक बाबींचा खुलासा
धर्मवीर या सिनेमामुळे आनंद दिघेंचा इतिहास अवघ्या महाराष्ट्राला कळला. या सिनेमाच्या दुसर्या भागाची घोषणा होताच प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता वाढली आहे. नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी ‘धर्मवीर २’ (Dharmaveer 2) बाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी ‘धर्मवीर २’ या सिनेमाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे (Anand Dighe) या दोन्ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचं मंगेश देसाई म्हणाले.
‘धर्मवीर २’ या सिनेमाबद्दल निर्माते मंगेश देसाई म्हणाले, ‘अंदाजे नोव्हेंबर महिन्यात ‘धर्मवीर २’ या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे दोन आपले साहेब आहेत. दिघे साहेबांच्या काही गोष्टी ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) या सिनेमात दाखवण्यात आल्या आहेत. पण तरी त्यांच्या अनेक गोष्टी वेळेच्या मर्यादेमुळे सिनेमात दाखवण्यात आल्या नाहीत. या दोन्ही साहेबांचा अजेंडा हा ‘हिंदुत्व’ होता. त्यामुळे या दोन्ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट ‘धर्मवीर २’ मध्ये दाखवण्यात येणार आहे’.
या चित्रपटात काय काय पाहायला मिळणार याविषयी सांगताना मंगेश देसाई म्हणाले की, ज्वलंत हिंदुत्वासाठी दिघे साहेबांनी अनेक आंदोलने केली आहेत. दिघे साहेबांचं चरित्र दाखवताना दोन भाग नव्हे तर चार भागही पुरणार नाहीत. एवढ्या त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यांच्या अनेक गोष्टी दाखवायच्या राहिल्या आहेत. मलंगगड, बाबरी मस्जिद, दहावीची सराव परिक्षा दिघे साहेबांनी सुरू केलेली आहे. तसेच निवडणुकीची स्ट्रॅटेजी ते कशाप्रकारे आखायचे, अशा बऱ्याच मोठमोठ्या गोष्टी या सिनेमात दाखवण्यात येणार आहेत. हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबतच त्यांचं प्रबोधनदेखील करेल.
दिघे साहेबांकडे कसे पाहता याबद्दल बोलताना मंगेश देसाई म्हणाले, ‘दिघे साहेब म्हणजे उत्साह. प्रत्येकवेळेस दिघे साहेबांबद्दल बोलताना अंगावर काटा येतो. मी त्यांना एक शक्ती मानतो. आनंद दिघे साहेबांकडे माझा पाहण्याचा दृष्टिकोन हा शक्ती, उत्साह, निश्चय आणि आत्मविश्वास आहे. आनंद दिघे साहेबांसोबत माझी दोनदा भेट झाली आहे. माझं ‘जाऊबाई जोरात’ हे नाटक पाहायला दिघे साहेब आले होते. त्यानंतर माझ्या एका मित्राच्या दुकानाच्या ओपनिंगला दिघे साहेब आले होते’, अशी एक आठवणही त्यांनी सांगितली.
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…