Saturday, July 20, 2024
Homeदेशअमेठीतून राहुल गांधी, तर प्रियंका वाराणसीतून मोदींविरोधात लढणार, यूपी काँग्रेस अध्यक्षांची माहिती

अमेठीतून राहुल गांधी, तर प्रियंका वाराणसीतून मोदींविरोधात लढणार, यूपी काँग्रेस अध्यक्षांची माहिती

नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी २०१४ची लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून लढणार आहेत. ही माहती शुक्रवारी यूपी काँग्रेसचे प्रभारी अजय राय यांनी पत्रकारांना दिली. त्यांनी या दरम्यान असेही सांगितले की केरळच्या वायनाडच्या खासदारांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा कोठून निवडणूक लढणार हे ही सांगितले. राय यांच्या मते,प्रियंकांना जर वाटले तर त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातूनही वाराणसीतूनही निवडणूक लढवू शकतात.

प्रियंका यांच्यासाठी कार्यकर्ते प्राणपणाने लढू शकतात. मीडियाने अजय राय यांना राहुल अमेठीतून निवडणूक लढवणार का याबाबतचा सवाल केला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिले की, नक्कीच. ते अमेठीतून निवडणूक लढवतील. जर प्रियंका गांधी यांची वाराणसीतून निवडणूक लढवण्याची इच्छा असेल तर आमचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्यासाठी दिवस रात्र काम करेल.

स्मृती इराणींवर राय यांचा निशाणा

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्याशी संबंधित प्रश्नावर बोलताना अजय राय यांनी टीकेची झोड उठवली. १३ रूपये प्रति किलोच्या हिशेबाने त्या साखर देणार होत्या? त्यांनी साखर दिली आहे. आमचे लोक अमेठीतून आले आहेत तुम्ही त्यांना विचारा की त्या काय म्हणाल्या होत्या. अशातच जनतेला त्यांनी उत्तर दिले पाहिजे.

 

लोकसभा का महत्त्वाची?

उत्तर प्रदेशातील ८० लोकसभेच्या जागांपैकी एक अमेठी आहे.येथील खासदार इराणी आहेत. त्यांनी २०१९मध्ये निवडणूक जिंकली होती. तर याआधी तीन वेळा २००४, २००९ आणि २०१४मध्ये राहुल या ठिकाणी खासदार राहिले होते. राहुल यांच्या आधी सोनिया यांनी १९९९मध्ये या ठिकाणाहून विजय मिळवला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -