Narli Pournima : सण आयलाय गो आयलाय गो... नारळी पुनवेचा!

कोळी बांधवांकडून होडीच्या सजावटीची जय्यत सुरुवात... पाहा याचा खास व्हिडीओ


जाणून घ्या काय आहे नारळी पौर्णिमेमागील शास्त्रीय कारण?


मुंबई : चातुर्मासाची सुरुवात करणारा श्रावण (Shrawan) महिना तसा सणासुदीने भरलेलाच. याच श्रावणातील नागपंचमी, गोकुळाष्टमी, दहिहंडी, श्रावणी सोमवार या सणांबरोबरच उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजेच नारळी पौर्णिमा (Narli Pournima). समुद्रकिनारी राहणारे व समुद्राशी खूप जवळचा संबंध असणारे कोळी लोक हा सण खूप उत्साहाने साजरा करतात.


यंदाच्या वर्षीही या नारळीपौर्णिमेच्या सणाची जोरदार तयारी कोळी बांधवांनी सुरु केली आहे. त्यांनी आपापल्या होड्यांना रंगरंगोटी करुन सजवण्यास सुरुवात केली आहे. अगदी पूर्वीपासून ते आजतागायत चालत आलेली ही परंपरा ते अगदी आनंदाने जपत आहेत. पण याचे एक शास्त्रीय कारणदेखील आहे. श्रावण महिना म्हणजे पावसाचा काळ. या काळात समुद्र खवळलेला असतो. तसेच हा माशांचा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे नारळीपौर्णिमेच्या काही दिवस अगोदरच कोळी बांधव समुद्रात जाणे, मासेमारी करणे बंद करतात. म्हणजेच निसर्गाचे रक्षण केले जाते.


या सणाला धार्मिक बाजूदेखील आहे. समुद्र हे वरूण देवाचे स्थान समजले जाते. वरुण देव हा पश्चिम दिशेचा रक्षक असून त्याला या नारळीपौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण करुन त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. मासेमारीचा बंद केलेला व्यवसाय नारळीपौर्णिमेच्या दिवशी पुन्हा सुरु केला जातो. पावसाळा संपलेला असतो त्यामुळे सागराची पूजा करुन व्यवसायाचा शुभारंभ केला जातो. नारळीपौर्णिमेच्या दिवशी मासेमारीचा शुभारंभ करताना होडीला रंगरंगोटी करुन सजवले जाते, पताका लावून सुशोभित केले जाते. आपल्या उदरनिर्वाहासाठी कामी येणार्‍या प्रत्येक गोष्टीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची कोळ्यांची भावना यातून दिसून येते.


अत्यंत पारंपरिक पद्धतीने साजर्‍या केल्या जाणार्‍या या सणाची लगबग मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमधील कोळीवाड्यात जास्त प्रमाणात पाहायला मिळते. अशाच उत्साहात यंदाच्या नारळीपौर्णिमेसाठी कोळी बांधवांची लगबग सुरु झाली आहे. माहिम रेती बंदर, कोळीवाडा येथील काही कोळी बांधवांची होड्या सजवतानाची खास दृश्ये टिपली आहेत आमचे छायाचित्रकार अरुण पाटील यांनी...



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Mumbai - Pune Missing Link : मुंबई - पुणे मिसिंग लिंक बंद राहणार, काय आहे कारण ? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकचा मुंबई - पुणे मार्ग दुरुस्तीचे काम आणि मॉक ड्रिल या

Mangal Prabhat Lodha : '‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश गणेशोत्सवातून द्यावा; गणेश मंडळांनी समाजप्रबोधनावर भर द्यावा'

मुंबई : मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवातील देखावे व सजावट ‘ड्रग्स

Tejasvi Ghosalkar : मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी ३ राखीव डबे हवेत; भाजप नेत्या तेजस्वी घोसाळकर यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

Mumbai : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासात विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आणि वाढती गर्दी लक्षात घेता, एक मोठा

Chandrakant Patil : 'राज्यातील विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक वेळापत्रक राबवावे'

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी

Mumbra Railway Accident : मुंब्रा रेल्वे पुलाजवळ लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट

मुंबई : मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर (Mumbai Local Train) मंगळवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. चालत्या लोकलमधून पडल्याने 27

Eknath Shinde : ‘शहरीकरण समस्या नाही, मोठी संधी’; ब्रिक्स देशांतील शहरांनी नवकल्पनांतून विकास साधावा

- मुंबईत ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’ला सुरुवात; सहकार्य, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासावर