Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

कोविड सेंटर घोटाळा: ईडीनंतर मुंबई पोलिसांकडून संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांना अटक

कोविड सेंटर घोटाळा: ईडीनंतर मुंबई पोलिसांकडून संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांना अटक

मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुजित पाटकर (sujit patkar) यांना कोविड सेंटर घोटाळा (covid centre scam) प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरूवारी अटक केली. यानंतर त्यांना मुंबईच्या दंडाधिकारी न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुजित पाटकर यांना याआधी ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपात अटक केली होती ते न्यायालयीन कोठडीत होते.

मुंबईच्या न्यायालयाने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र आणि व्यवसायिक असलेल्या सुजित पाटकर यांना पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडी त पाठवले आङे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप लगावला की पाटकर यांनी देशातील सर्वात श्रीमंत नगरपालिका बीएमसीशी संबंधित कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा केला. त्यानंतर ईडीने याप्रकरणामनी लाँड्रिंगच्या प्रकरणात तपास सुरू केला.

ईडीने अनेकदा पाटकर यांची चौकशी केली तसेच त्यांच्या घरावरही छापे टाकले. गेल्याच महिन्यात पाटकर यांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीने या घोटाळ्याशी संबंधित आरोपात डॉक्टर किशोर बिसुरे यांनाही अटक केली.

काय आहेत आरोप?

ईडीने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंगची केस दाखल केली होती. हेल्थकेअर क्षेत्रात कोणताही अनुभव नसताना पाटकर यांना कोरोना महामारीदरम्यान मुंबईत कोविड सेंटर बनवण्याचे काम सोपवण्यात आले असा आरोप करण्यात आला.

Comments
Add Comment