
मंडी : हिमाचल प्रदेशमध्ये भूस्सखलनामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत या भूस्सखलनात ७१ लोकांचा मृत्यू झाला. येथील ५४ वर्षीय अशोक गुलेरिया भारतीय सैन्यातून लान्स नायक पदावरून रिटायर झाल्यानंतर शिमल्यामध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.
दोन वर्षांपूर्वी मंडी जिल्ह्यात आपल्या गावात त्यांनी ८० लाख रूपये खर्च करून घर बनवले होते. त्यानंतर त्याचे इंटीरियर तसचे फर्निचर करण्यात आणखी काही रूपये खर्च केले. त्यांनी या घरावर एकूण १ कोटी हून अधिक रूपये खर्च केले. मात्र त्यांचे हे स्वप्नांraचे घर आलेल्या पावसाने पूर्णपणे कोसळले. रिपोर्टनुसार १४ ऑगस्टच्या सकाळी हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्सखलनानंतर त्यांचे घर म्हणजे एक मातीचा ढिगारा बनले. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांचे घर पाण्यात वाहून गेले. दरम्यान, त्यांनी आपले कर्तव्य मात्र सोडले नाही आणि आपल्या ड्युटीवर ते निघून गेले.
एक कोटीपेक्षा अधिक खर्च
गुलेरिया यांचे हे तीन मजली घर होते. गुलेरिया यांनी या घरावर फर्निचरसह एक कोटी रूपयांहून अधिक खर्च केला होता. ते बाहेर उभी असलेली आपली कारही काढू शकले नाहीत तर गावाच्या बाहेरचा रस्ता आधीच खचला होता.
इतक्या मेहनतीने त्यांनी आपले हे स्वप्नांचे घर बांधले होते. मात्र पावसाने ते वाहून गेले. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या स्वप्नांचे घर वाहत जाताना पिह्लायनंतर काही तासांनीच ते शिमल्यामध्ये आपल्या ड्युटीवर गेले. याबाबत ते म्हणतात की घर तर गेले मात्र नोकरी तर आहे. यामुळे कर्तव्याचे पालन केलेच पाहिजे.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार गुलेरिया आपल्या पत्नीसह शिमला येथे राहतात आणि गावात येऊन जाऊन राहतात. हे घर त्यांनी रिटायर झाल्यानंतर बनवले होते. त्यांच्या मुलीचे लग्न झाले तर मुलगा इंजीनियर आहे. तो चंदीगडमध्ये काम करतो.
Several house collapse due landslide at Sarkaghat in Mandi of Himachal Pradesh, India 🇮🇳
TELEGRAM JOIN 👉 https://t.co/9cTkji5aZq pic.twitter.com/purw8ewT7i
— Disaster News (@Top_Disaster) August 16, 2023
पाच हजारांची मदत घेण्यास नकार
गुलेरिया यांना मंगळवारी फोन आला की जिल्हा प्रशासनाकडून पाच हजार रूपयांची तात्काळ मदत दिली जात आहे. बाकी इतर मदतीच्या रकमेबाबत अद्याप निश्चिती झालेली नाही. मात्र त्यांनी ती मदत घेतली नाही. ते म्हणाले की या पाच हजार रूपयांची गरज काय आहे.
पुन्हा घर बांधणे कठीण
हिमाचल प्रदेशमध्ये भूस्सखलनामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. काहींनी घाबरून तर भाड्याच्या घरात राहणे पसंत केले.मात्र काही जण आपला जीव धोक्यात घालून तेथे राहत आहेत. त्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत. ज्यांना सोडून ते येऊ शकत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार ज्यांची घरे वाहून गेलीत त्यांना आता परत घरे बांधणे अशक्य आहे. ते सरकारकडून मदतीची आशा करत आहे.