Anandacha shidha : आनंदाची बातमी... आनंदाचा शिधा! सणांसाठी गृहिणींच्या खर्चाचा प्रश्न सुटला!

राज्य सरकारचा नवा निर्णय काय?


मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले?


मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेला खूश करण्यासाठी सरकार अगदी पुरेपूर प्रयत्न करत आहे. मोदी सरकारने (Modi government) नुकताच भाज्या, पेट्रोल, डिझेल, दूध यांचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आता राज्य सरकारसुद्धा (State government) सणांच्या पार्श्वभूमीवर गृहिणींसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सणासुदीचे दिवस जवळ आलेले असताना गरजोपयोगी वस्तूंच्या वाढलेल्या दरामुळे त्रस्त झालेल्या गृहिणींसाठी ही एक दिलासादायक बाब आहे.

मुंबईत आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet meeting) अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात आगामी काळातील गौरी-गणपती उत्सावासह दिवाळीत नागरिकांना १०० रुपयांत 'आनंदाचा शिधा' (Anandacha shidha) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त शंभर रुपयांमध्ये एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक किलो खाद्यतेल देण्यात येईल असं राज्य सरकारने जाहीर केलं आहे. राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना हा ‘आनंदाचा शिधा’ मिळणार आहे.

लाडक्या बाप्पाच्या आगमनसाठी आता काही दिवस उरले आहेत. त्यामुळे हा निर्णय गृहिणींना सुखावणारा आहे. यासाठी सरकारने वेळेवर शिधा संच एकत्रितपणे उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून लाभार्थी, दुकानदारांची गैरसोय होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर दुकानांमध्ये शिधा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी दुकानदारांकडून करण्यात येत आहे.

याशिवाय महाराष्ट्र कॅसिनो कायदा देखील रद्द करण्यात आला आहे. आदिवासी समाजासाठीच्या बिरसा मुंडा या नवीन योजनेला मान्यता मिळाली आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत:

  • आदिवासी विकास विभाग - राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडण्याचा निर्मय घेण्यात आला आहे. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबवण्यात येणार आहे व त्यासाठी पाच हजार कोटीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.

  • अन्न व नागरी पुरवठा - गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा, ज्यात प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असणार आहे.

  • कौशल्य विकास - आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनात भरीव वाढ मिळणार असून दरमहा ५०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  • महसूल विभाग - मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी देण्यात आली आहे.

  • गृह विभाग - महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्यात आला आहे.

  • महिला व बाल विकास - केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. तसेच यात राज्याचा हिस्सा वाढणार आहे.

  • सहकार विभाग - सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे घेण्यात येणार आहे.

  • विधी व न्याय विभाग - दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन देण्यात येणार आहे. मंडणगड येथे दिवाणी न्यायालय.


Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे जिओच्या अधिकाऱ्यांना निर्देश

नव्या टॉवर्ससह सेवा सक्षम करण्यावर

Nitesh Rane : देवगडच्या आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती मिळणार, प्रस्तावित कामांच्या नियोजनाचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देताना स्थानिक

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसानभरपाई धोरणाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून मंत्रालय स्तरावर सर्वंकष आढावा

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा नव्याने विचार; TISS अहवालानंतर निर्णय घेणार ; मंत्री नितेश राणे मुंबई :

Nitesh Rane : पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी

Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार; चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासह सर्व घटकांवर ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के

Jaykumar Rawal and Shambhuraj Desai : आग्रा येथील शिवपराक्रम नव्या पिढीपर्यंत; १७ ऑगस्ट ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा होणार

आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार -राजशिष्टाचार