सिडको : अंबड गावातील मयूर केशव दातीर (फडोळ मळा, अंबड) या युवकाच्या खून प्रकरणातील आरोपी करण अण्णा कडूसकर (वय २१), मुकेश अनिल मगर (वय २५), रविंद्र शांताराम आहेर (वय २८) यांना २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात आले आहे. अंबड तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने मोखाडा (जि. ठाणे) येथे केलेल्या संयुक्त कारवाईत तिघे आरोपी पोलिसांच्या हाती लागले.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, गुरूवारी दुपारी अंबड गावातील महालक्ष्मी नगरमधील हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली होती. दारू पिण्यासाठी पैसे मागण्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन प्राणघातक हल्ल्यात झाले. करण कडुसकर, रवी आहेर, मुकेश मगर यांनी धारदार शस्त्राने मयूर दातीर याच्या छाती व पोटावर वार केले. हे घाव वर्मी बसल्याने मयूरचा जागीच मृत्यू झाला. यातील करण कडुसकर याच्यावर खून, घरफोडी सह १८ गुन्हे दाखल आहेत. तर मुकेश मगर याला हद्दपार करून अहमदनगर जिल्ह्यात सोडण्यात आले होते.
या घटनेचे वृत्त समजताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासास प्रारंभ केला होता. मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेत अंबड वासियांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. आरोपींचा माग काढत असताना ते घटनेनंतर त्र्यंबकेश्वर मार्गे मोखाडा येथे गेल्याची माहिती मिळताच अंबड व गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…