
आजपासून भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्याच्या टी २० मालिकेला सुरुवात होत आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वातील युवा भारतीय संघ मैदानात उतरला. यावेळी भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागल्या. तसेच कमबॅक करणा-या जसप्रीत बुमराहकडे सगळयांच्या नजरा खिळल्या.
आयर्लंडच्या संघात अनुभवी खेळाडूंचा भरणार आहे. टी २० क्रिकेटमध्ये आयर्लंडमध्येचे रेकॉर्ड चांगले आहे. दोन्ही संघामध्ये आतापर्यत पाच टी २० सामने झाले आहेत. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. पण आयर्लंडकडून प्रतिक्रार पाहायला मिळाला होता.