Tuesday, December 3, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीWamanrao Pai : वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे

Wamanrao Pai : वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे

  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै

आकार व संस्कार हे दोन्ही व्यक्तिमत्त्व निर्माण करतात. संस्कार! संस्कार जे केले जातात ते महत्त्वाचे असतात. जन्माला आलेल्या मुलाकडे काय असते? तो हिंदू किंवा मुसलमान काही नसतो, त्याला हे काही माहीत नसते. त्याला पहिला संस्कार म्हणजे नाव देतो. बाराव्या दिवशी त्याला आपण नाव देतो. पुढे बापाचे नाव, पुढे आडनाव यावर सगळे जात-धर्म येऊन चिकटतात. नावाबरोबर हे सगळे येऊन चिकटते. हे लटांबर नावाला येऊन चिटकते व ते नाव या सर्वांसकट आपल्याला चिकटलेले असते आणि त्याचे एक व्यक्तिमत्त्व तयार होते. मग तो म्हणतो, मी हिंदू, मी मुसलमान, मी ख्रिश्चन. हे सगळं कधी? तो जन्माला आला, तेव्हा हे काही नव्हते. नाव दिल्याबरोबर हे सगळं येऊन चिकटले.

पुढे आणखी संस्कार दिले जातात. श्रेष्ठ कनिष्ठ, आमचा धर्म श्रेष्ठ, आमचा देव श्रेष्ठ. तुम्ही आमच्या धर्मात या नाहीतर आम्ही काही, तरी करू. ही वृत्ती निर्माण झाली यालाच धर्माभिमान म्हणतात. या धर्मामध्ये पुन्हा जाती आहेतच. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, पुन्हा त्यात उपजाती, त्यात पुन्हा पोटजाती हा सगळा गोतावळा आला व आपण याला संस्कार म्हणतो. यातून संस्कार जे करतो त्यातून मी श्रेष्ठ-कनिष्ठ ही भावना निर्माण झाली. Superiority complex, inferiority complex या दोन्ही गोष्टी निर्माण झाल्या, हे सगळे घटक आहे. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन असल्याने काही बिघडत नाही. आमचे घराणे श्रेष्ठ, आमची जात श्रेष्ठ, तुम्ही कनिष्ठ इथे सगळं बिघडले. तुकाराम महाराज सांगतात,

“विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म,
भेदाभेद भ्रम अमंगळ
आइकाजी तुम्ही भक्तभागवत,
कराल ते हित सत्य करा
कुणाही भुताचा न घडो मत्सर,
वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे
तुका म्हणे एका देहाचे अवयव,
सुखदुःख जीव भोग पावे.”

हित शब्द महत्त्वाचा आहे. हे हित लोक बघत नाहीत. सगळा घात झाला याचे कारण तुकाराम महाराज सांगतात ते हित लोक बघत नाहीत. “न घडो कुणाही भुताचा मत्सर वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे.” वर्म हा शब्द वापरलेला आहे. धर्माचे वर्म हे आहे, कर्माचे वर्म हे आहे, जातीचे वर्म हे आहे. हे वर्म विसरलात की, भेद करायला सुरुवात होते. एकदा हे वर्म आठवले की, विष्णुमय जग म्हणजे हे जग दिव्य आहे, हे जग देव आहे, हे जग विष्णुमय आहे, हे जग ईश्वर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -