Sanjay Dutt : तलवारीमुळे डोके फुटले; शूटिंगदरम्यान संजय दत्त थोडक्यात बचावला!

  148

मुंबई : ‘डबल आईस्मार्ट’ या चित्रपटाच्या (Double iSmart) शूटिंग दरम्यान अभिनेता संजय दत्तच्या (Sanjay Dutt) डोक्याला तलवार लागल्याने या अपघात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला टाके मारावे लागले.


संजय दत्त सध्या दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीमध्ये एन्ट्री केल्याचे पहायला मिळत आहे.


लवकरच त्याचा ‘डबल इस्मार्ट’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान संजय दत्तच्या डोक्याला टाके पडल्याचे सांगितले जात आहे. ’डबल इस्मार्ट’ या सिनेमाचे बँकॉकमध्ये शूटिंग सुरु आहे. तलवारबाजीचा सीन शूट करत असताना संजय दत्तचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या डोक्याला टाके पडले आहेत.


त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. परंतु संजय दत्तने उपचार घेतल्यावर शुटिंग पूर्ण करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती आणि आता संजय दत्त पूर्णपणे बरा असल्याचे सांगितले जात आहे. ‘डबल इस्मार्ट’ हा संजय दत्तचा पहिला तेलुगू सिनेमा आहे.


संजय दत्तने ‘केजीएफ चॅप्टर २’ या सिनेमाच्या माध्यमातून कन्नड मनोरंजन सृष्टीमध्ये एन्ट्री केली होती. यानंतर त्याचा ‘लियो’ हा सिनेमा तामिळ भाषेत आहे. या सिनेमातून तो तामिळ मनोरंजनसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे.

Comments
Add Comment

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९