- समर्थ कृपा : विलास खानोलकर
तिन्ही गोसाव्यांनी श्री स्वामी समर्थांकडे मार्गदर्शन मागितल्यानंतर जगद्गुरू श्री स्वामी महाराज म्हणाले, “संतांच्या भाषणावर विश्वास ठेवा, संतांना शरण जा, गर्व अगदी टाकून द्या. भजन, पूजन, नामस्मरण करीत जा. यदृच्छेनं मिळेल त्यात संतुष्ट असा. भूतमात्री आत्मा आहे, करिता कोणत्याही भुताला काया-वाचा-मनाने पीडा देऊ नका. माझ्या ठिकाणी प्रेम ठेवा. कर्ता-करविता ईश्वर आहे, अशी भावना ठेवा. भक्तीचा आश्रय करा. याप्रमाणे उपासना सिद्ध झाली म्हणजे तुम्ही कृतकार्य व्हाल. जा आता.” त्यावर ते तिघे म्हणाले, “आता आम्हास कोठे जाण्यास सांगता. आपल्या चरणापाशीच सेवेला ठेवा. आता हे चरण सोडावेसे वाटत नाही. या चरण तेजापुढे तीर्थक्षेत्रे, देव किंवा साधू यांची प्रतिष्ठा नाही. कारण, ती तीर्थक्षेत्रे किंवा देवता तत्काळ फळ देत नाहीत. पण या चरणांचे दर्शन होताच सर्व प्रकारचे मानसिक दोष जाऊन आम्ही शुद्ध झालो आहोत. आज जशी आमची स्थिती आहे, तशीच उत्तरोत्तर वाढत जाऊन आपल्या चरणांची अखंड भक्ती घडावी व अद्वैतप्रेम आमच्या हृदयात भरून राहावे, हेच मागणे आहे. आपल्या चरणांचा विसर कोणत्याही जन्मात पडू नये.” अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली. श्री स्वामी महाराजांनी त्यांना प्रसाद दिला. तो त्यांनी श्रद्धेने भक्षण केला. श्री स्वामी समर्थ समाधिस्थ होईपर्यंत ते त्यांच्या सेवेत अक्कलकोटातच राहिले. नंतर ते तिघेही तीर्थयात्रेस निघून गेले.
वरील लीला कथा भागातून श्री स्वामींनी त्यांना केलेले मार्गदर्शन “संतांच्या भाषणावर विश्वास ठेवा, संतांना शरण जा, गर्व अगदी टाकून द्या, भजन पूजन, नामस्मरण करीत जा. यदृच्छेने मिळेल त्यात संतुष्ट असा. भूतमात्री आत्मा आहे. याकरिता कोणत्याही भुताला काया-वाचा-मनाने पीडा देऊ नका. माझ्या ठिकाणी प्रेम ठेवा. कर्ता-करविता ईश्वर आहे, अशी भावना ठेवा. भक्तीचा आश्रय करा. याप्रमाणे उपासना सिद्ध झाली म्हणजे तुम्ही कृतकार्य व्हाल. जा आता.”
अतिशय मौलिक, त्या तीन गोसाव्यांनाच नव्हे, तर ते आपणासही सद्यस्थितीत प्रबोधित करणारे आहे. श्री स्वामी त्या तिघांनाही उपदेश करून “जा आता” असे अखेरीस म्हणाले, तेही अर्थपूर्ण आहे. जेव्हा जेव्हा श्री स्वामी मुखातून “जा” असा उद्गार बाहेर पडायचा, तेव्हा त्याचा अर्थच मुळी “आता तुम्ही निश्चिंत राहा. भिऊ नका मी (श्री स्वामी) तुमच्याबरोबर आहे” असा होतो.
त्या तिन्ही गोसाव्यांना अंतिमत हा आशीर्वाद का प्राप्त झाला? सुरुवातीस ते कसे होते? या बाबींचा विचार करून तुम्ही – आम्हीही बदलावयास हवे. वाल्या कोळ्याचाही वाल्मीकी ऋषी झाला हे आपणास ज्ञात आहे; परंतु श्री स्वामी समर्थांनी त्या तिघांना इतका भरभक्कम दिलासा देऊनसुद्धा ते श्री स्वामींना सोडण्यास अजिबात तयार नव्हते. हे त्यांच्या “आता आम्हास कोठे जाण्यास सांगता? आपल्या चरणापाशीच सेवेला ठेवा. आता हे चरण सोडावेसे वाटत नाही. या चरण तेजापुढे तीर्थक्षेत्रे, देव किंवा साधू यांची प्रतिष्ठा नाही. कारण ती तीर्थक्षेत्रे किंवा देवता तत्काळ फळ देत नाहीत, पण या चरणांचे दर्शन होताच सर्व प्रकारचे मानसिक दोष जाऊन आम्ही शुद्ध झालो आहोत. आज जशी आमची स्थिती आहे, तशीच उत्तरोत्तर वाढत जाऊन आपल्या चरणांशी अखंड भक्ती घडावी व अद्वैतप्रेम आमच्या हृदयात भरून राहावे, हेच मागणे आहे, आपल्या चरणांचा विसर कोणत्याही जन्मात पडू नये” या आत्मकथनातून स्पष्ट होतो.
या लीलाकथेचा हा भाग आपणास काय सांगतो? “श्री स्वामी समर्थांच्या चरणाविण अन्य दुजे काहीही श्रेष्ठ नाही.” हाच प्रमुख बोध यातून मिळतो.
स्वामी समुद्रस्नान सोहळा
घ्या स्वामी नाम,
दिनरात दिनशाम॥ १॥
प्रसन्न होईल रामशाम,
प्रसन्न होईल लक्ष्मणराम॥ २॥
प्रसन्न होईल खरा बलराम,
ताकद देईल हनुमान राम॥ ३॥
काम करेल सारे तमाम,
शत्रूला लावेल हमाम॥ ४॥
शत्रूला फुटेल घाम,
शत्रूचे बेचीराख नाम॥ ५॥
स्वामीनाम वा हनुमान नाम,
दत्तनाम तेच स्वामी नाम॥ ६॥
हनुमान चाळीसा म्हणा,
वा स्वामी चाळीसा॥ ७॥
व्यायाम करा जाईल आळस,
भरेल अंगाला बाळस॥ ८॥
रोज करा नवा बारसा,
चकीत होईल जुना आरसा॥ ९॥
मागवा नवा आरसा,
मिळेल खानदाना नवावारसा॥ १०॥
रोज होईल दिवाळी दसरा,
मुला-बाळांचा चेहरा हसरा॥ ११॥
पती-पत्नी काळजी विसरा,
ठेवा चेहरा हसरा॥ १२॥
सासूसून हातपाय पसरा,
मंगळागौरीत फुगडीत घसरा॥ १३॥
नातू विचारा नातूचा नातू नातू,
तो सांगेल मी स्वामींचा नातू॥ १४॥
आणि दत्तात्रयाचा पणतू,
अनुसुयाचा खापर पणतू॥ १५॥
उमाशंकराचा मानस पुत्र तू,
इंद्रदेवाचा अतिमानस पुत्र तू॥ १७॥
हनुमानसारखा वायू पुत्र तू,
श्रीराम सीतेचा लवअंकुश तू॥ १८॥
अर्जुन पुत्र अभिमन्यू तू,
उमापतीचा गणेश तू॥ १९॥
जसा स्वामी जन्म उत्सव,
तसा स्वामी प्रकट उत्सव॥ २०॥
स्वामींच्या कार्यात भक्ताला उत्साह,
स्वामींचा पालखीत अतिउत्साह॥२१॥
सफेद घोडा दाखवे उत्साह,
बैलगाडीचा बैल दाखवे उत्साह॥२२॥
लहान थोर उत्साह,
बालक पालक उत्साह॥ २३॥
झांज चिपळ्या उत्साह,
लेझीम ढोलकी उत्साह॥ २४॥
रस्त्यात सुंदर रांगोळी,
भक्त स्वामी अभ्यंग आंघोळी॥ २५॥
लाल पायघडी लांब ओळी,
गिरगांव ते चौपाटी उभी मंडळी॥ २६॥
स्वामींच्या स्वागतात पावसाच्या पाघोळी, तर कधी गुलाबपाण्याच्या आंघोळी॥ २७॥
समुद्रावर स्वामीसमर्थ ही आरोळी,
पादुका स्नान समयी गंगे भागिरथी आरोळी॥ २८॥
गंगा-यमुना उभ्या ओळी ओळी,
साक्षात लक्ष्मी सरस्वती उभी ओळी ओळी॥ २९॥
वाजे ढोल डमरू उडती फटाके, आकाशी, सारे देव स्वामी स्नानासाठी उभे आकाशी॥ ३०॥
लोक आनंदे लागती डोलू,
हृदयातील गुपीत स्वामी खोलू॥ ३१॥
स्वामी देती आशिर्वाद आनंदे,
तीर्थ प्रसाद वाटती अतिआनंदे॥ ३२॥
लाह्या फुटाणे पेढे स्विकारती आनंदे,
स्वामी आशिर्वाद मागती आनंदे॥३३॥
फुलांचा वर्षाव बहुत होती,
बुका गुलाल आकाशी उडती॥ ३४॥
ईश्वरी आशीर्वादाचा सोहळा,
खरा समुद्र स्नान सोहळा॥ ३५॥
भक्त इच्छेसाठी स्वामी घेती,
पुर्नजन्म, शंभर शतके उभे स्वामी
शतजन्म॥ ३६॥
स्वामी आशीर्वाद सदासंगती,
भिऊ नको मी तुझ संगती॥ ३७॥
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी,
स्वामीनामात करोडोचे पुण्य तुझ्या गाठीशी॥ ३८॥
अमरविलास वाणी सांगे,
स्वामी देती जेजे भक्त मागे॥ ३९॥
स्वामी चालिसा इति संपूर्ण,
भक्त विलासकृत तीर्थ प्रसाद
पूर्ण॥ ४०॥
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra