
क्वालांलपूर: मलेशियामध्ये (malaysia) गुरूवारी खाजगी विमानाला (private aeroplane) अपघात झाल्याने १० लोकांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात (accident) विमान उतरत असताना एलमिना टाऊनशिपच्या जवळ झाला. या विमानात २ क्रू मेंबर आणि ६ प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचाही मृत्यू झाला.
मलेशियाच्या नागरी उड्डाण प्राधिकरणानुसार हे विमान लँगकावी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुल्तान अब्दुल अजीज शाह विमानतळाच्या दिशेने जात होते.या अपघाताआधी विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी असलेला संपर्क तुटला. हे विमान रस्त्यावर उतरत असताना एका कार आणि बाईटकला त्याची टक्कर बसली. सिव्हिल एव्हिएनशन ऑथॉरिटीच्या
इर्मजन्सी कॉल मिळाला नाही
सेलांगोरचे पोलीस चीफ हुसैन ओमार खान यांनी सांगितले की विमान उतरवण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. पायलटकडून कोणताही इर्मजन्सी सिग्नल देण्यात आला नव्हता. विमान वाहतूक विभागाचे अधिकारी नोराजमान यांनी सांगितले की पायलटने २ वाजून ४७ मिनिटांनी एअर ट्राफिक कंट्रोल टॉवरशी संपर्क केला होता. त्याला २ वाजून ४८ मिनिटाला विमान उतरवण्याची परवानगी देण्यात आली होती.
#WATCH: Malaysia Plane Crash footage from a dash cam of car.
At least 10 people killed as private plane crashed in Malaysia.#Malaysia #MalaysiaPlaneCrash #PlaneCrash #Elmina pic.twitter.com/nccqAjWJ1q
— Ashmita Chhabria (@ChhabriaAshmita) August 17, 2023
यानंतर विमानाशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही आणि २ वाजून ५१ मिनिटांनी विमानाच्या अपघातस्थळावरून धूर निघताना दिसला. हे विमान जेट व्हॅलेट कंपनी ऑपरेट करत होती. त