
नितेश राणे यांच्या आंदोलनाचं महत्त्व कोकणवासीयांना समजलं
खरा विकास आणि भावनिक खोटं राजकारण जनताच ठरवेल
सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa highway) पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या गोष्टीकडे लक्ष देण्याऐवजी निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने महामार्गावरून सध्या राजकारण सुरू आहे. भाजपचे कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मात्र जुलै २०१९ मध्येच या गोष्टीची दखल घेतली. त्यांनी केलेल्या अनोख्या आंदोलनाचे महत्त्व कोकणवासीयांना आता कळले आहे. त्यामुळे त्यावेळेस या आंदोलनाला विरोध केलेल्या विरोधकांना चांगलीच अदद्ल घडली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम पूर्ण होत नसल्याने २०१९ मध्ये नितेश राणे यांनी संबंधित अभियंत्याला चिखलाने आंघोळ घातली होती. या गोष्टीला तेव्हा शिवसेनेच्या लोकांनी नितेश राणेंची गुंडगिरी संबोधून विरोध केला व कारवाईची मागणी केली. रत्नागिरी-रायगडची (Ratnagiri Raigad) जनता ह्याच शिवसेना नेत्यांना पाठिंबा देत होती. त्यामुळे नितेश राणेंना आठ दिवस तुरुंगवासही भोगावा लागला. मात्र, काहीतरी मिळवण्यासाठी त्यागही करावाच लागतो, या उक्तीप्रमाणे नितेश राणे या गोष्टीलाही सामोरे गेले.

अखेर, राजकारणात आपली स्वतःची एक वेगळी स्टाईल निर्माण केलेल्या राणे परिवारातील नितेश राणे यांच्या आंदोलनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलदगतीने संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गाचे काँक्रीटीकरण होऊन दीड वर्षापूर्वीच चौपदरीकरण पूर्ण झाले. शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाठिंबा देणाऱ्या रत्नागिरी-रायगडची इच्छाशक्ती मात्र कमी पडली. चिपळूणचा वाळूचोर भास्कर जाधव हायवे ठेकेदारांच्या पैशांवर मुलाचे थाटामाटात लग्न करत होता पण त्याला जनता दिसत नव्हती. परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम पूर्ण झालं मात्र रायगड-रत्नागिरीमध्ये ते होऊ शकलं नाही.
मुंबई-गोवा महामार्गावर सध्या असलेल्या खड्ड्यामुळे लोक आक्रमक झाले आहेत तेव्हा आता बाकीच्या पक्षातील लोकांना दुरुस्तीबद्दल सुचू लागलं आहे. पण त्यामुळे केवळ निवडणूक जवळ आल्यानेच या महामार्गाचं राजकारण केलं जात आहे, अशी चर्चा लोकांमध्ये सुरु झाली आहे. त्यावेळेस नितेश राणेंच्या विरोधात उभे राहिलेल्यांना देखील आता या आंदोलनाचं महत्त्व कळू लागलं आहे. जे बाकी पक्षांना आता कळतंय ते नितेश राणेंना चार वर्षांपूर्वीच कळलं होतं. शेवटी खरा विकास कोण करु शकतं आणि भावनिक खोटं राजकारण कोण करतं हे जनताच ठरवेल.
चंद्रकांत साळुंके,मलकापूर जि बुलडाणा August 19, 2023 12:12 PM
खूपच छान,मा.नितेश राणेसाहेब यांचे आक्रमकपणातून त्या कामाविषयी असलेली तळमळ लक्षात येते.अभिनंदन