Friday, July 19, 2024
Homeक्रीडाIND vs IRE: भारत वि आयर्लंड पहिली टी-२०, पाहा कधी, किती वाजता...

IND vs IRE: भारत वि आयर्लंड पहिली टी-२०, पाहा कधी, किती वाजता सुरू होणार सामना

मुंबई: दुखापतीमुळे ११ महिन्यांच्या सुट्टीनंतर संघात परतलेला जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत आयर्लंडविरुद्ध (ireland) टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. उद्या आयर्लंडविरुद्ध टीम इंडिया (team india) मैदानात उतरणार आहे. आशिया कप आधी होणारी ही मालिका म्हणजे खेळाडूंची एक प्रकारची फिटनेस चाचणीच असणार आहे. आशिया कपच्या स्पर्धा या महिन्यातच ३० ऑगस्टला सुरू होत आहेत. त्यानंतर भारतात वर्ल्डकपला सुरूवात होत आहे.

बुमराहसह सर्वांच्या नजरा ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंह आणि जितेश शर्मा सारख्या युवा खेळाडूंच्या कामगिरीवर असेल. संजू सॅमसनवरही सर्वांच्या नजरा असतील. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यावर त्याची कामगिरी निराशाजनक पाहायला मिळाली. भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामन्याबाबत जाणून घ्या सर्व काही…

भारत वि आयर्लंड पहिला टी-२० सामना

कधी : १८ ऑगस्ट शुक्रवार
कुठे: द व्हिलेज,डबलिन
वेळ : संध्याकाळी साडेसात वाजता
कुठे पाहू शकता : स्पोर्ट्स १८-१, स्पोर्ट्स १८-१ एचडी

संभाव्य प्लेईंग ११ 

भारत : ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह(कर्णधार)

आयर्लंड : पॉल स्टर्लिंग(कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, कर्टिस कँपर, जॉर्ज डॉकरेल, जोश लिटिल, बेरी मॅक्कार्थी, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर, थियो वॅन वोकॉर्म, क्रेग यंग.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -