
मुंबई: दुखापतीमुळे ११ महिन्यांच्या सुट्टीनंतर संघात परतलेला जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत आयर्लंडविरुद्ध (ireland) टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. उद्या आयर्लंडविरुद्ध टीम इंडिया (team india) मैदानात उतरणार आहे. आशिया कप आधी होणारी ही मालिका म्हणजे खेळाडूंची एक प्रकारची फिटनेस चाचणीच असणार आहे. आशिया कपच्या स्पर्धा या महिन्यातच ३० ऑगस्टला सुरू होत आहेत. त्यानंतर भारतात वर्ल्डकपला सुरूवात होत आहे.
बुमराहसह सर्वांच्या नजरा ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंह आणि जितेश शर्मा सारख्या युवा खेळाडूंच्या कामगिरीवर असेल. संजू सॅमसनवरही सर्वांच्या नजरा असतील. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यावर त्याची कामगिरी निराशाजनक पाहायला मिळाली. भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामन्याबाबत जाणून घ्या सर्व काही...