Thursday, November 14, 2024
Homeक्रीडाAsia Cup 2023: कधी मिळणार भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट, जाणून घ्या

Asia Cup 2023: कधी मिळणार भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट, जाणून घ्या

मुंबई: आशिया कप २०२३ची सुरूवात येत्या ३० ऑगस्टपासून होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात रंगणार आहे. यावेळेस आशिया कपचे आयोजन हायब्रिड मॉडेलप्रमाणे होत आहे. या स्पर्धेतील ९ सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. तर ४ सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहेत.

श्रीलंकेत खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांची तिकीट विक्री गुरूवार म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणाऱ्या सामन्याचे तिकीट गुरूवारी खरेदी करू शकतात. हा सामना पल्लेकल येथे खेळवला जाणार आहे.

आजपासून तिकीट विक्री

खरंतर, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने प्रेस रिलीजद्वारे तिकीट विक्रीची माहिती दिली. पीसीबीने सांगितले की श्रीलंकेत खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांची तिकीटे १७ ऑगस्टला १२.३०वाजल्यापासून खरेदी करता येतील. तिकीट विक्रीचा दुसरा टप्पा संध्याकाळी सात वाजता सुरू होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ सप्टेंबरला सामना खेळवला जाईल. या सामन्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट आज चाहत्यांना मिळणार आहे. हे दोन्ही संघ पल्लेकलमध्ये आमनेसामने असतील.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार चाहत्यांना तिकीट खरेदी करण्यासाठी पासपोर्ट अथवा ओळखपत्राची गरज असेल. या दोन्हींपैकी कोणतेही एक कागदपत्र असणे गरजेचे आहे. एका ओळखपत्रावर तुम्हाला केवळ चार तिकीटे खरेदी करता येऊ शकतात. तर एका ओळखपत्राने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे केवळ दोन तिकीटे तुम्हाला मिळू शकतात. प्रेक्षक ऑनलाईन पद्धतीने याची तिकीटे खरेदी करू शकतात. यासाठी त्यांना पीसीबीच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

आशिया कप २०२३चा पहिला सामना मुल्तानमध्ये खेळवला जाईल. यानंतर ३ सप्टेंबरला बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात लाहोरमध्ये खेळवला जाईल. लाहोरमध्ये ५ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबरला सामने आयोजित केले जातील. याशिवाय बाकी ९ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचा शेवटचा सामना १७ सप्टेंबरला कोलंबोमध्ये होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -