Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीदेशात दोन दिवसांत २ पायलटचा अचानक मृत्यू

देशात दोन दिवसांत २ पायलटचा अचानक मृत्यू

नवी दिल्ली: देशात दोन दिवसांमध्ये २ पायलटचा मृत्यू (Pilot death) झाल्याची घटना घडली आहे. नागपूरमध्ये (nagpur) गुरूवारी इंडिगो ए्अरलाईन्सचा (indigo airlines) पायलट जेव्हा बोर्डिंगसाठी गेटवर पोहचला तेव्हा अचानक त्या पायलटचा मृत्यू झाला. हा पायलट अचानक बेशुद्ध होत खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तेथे मृत घोषित केले. दुसरीकडे, कतार एअरवेजच्या पायलटला बुधवारी फ्लाईटमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला.

इंडिगोच्या पायलटचा बोर्डिंग गेटजवळ मृत्यू

रिपोर्टनुसार, इंडिगोच्या पायलटने बुधवारी सकाळी ३ वाजल्यापासून ते ७ वाजेदरम्यान तिरूअनंतपुरम येथून पुणे होत पुढे नागपूरपर्यंत दोन सेक्टरमध्ये उड्डाण केले होते. त्यांना २७ तासांची विश्रांती मिळाली होती. त्यांना चार सेक्टरमध्ये उड्डाण करायचे होते. मात्र बोर्डिंग गेटजवळ दुपारी एक वाजण्याच्या हा पायलट बेशुद्ध होऊन पडला. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूचे कारण कार्डिएक अरेस्ट असे सांगितले.

कतार एअरवेजच्या पायलटला फ्लाईटमध्ये हृदयविकाराचा झटका

दुसऱ्या घटनेत कतार एअरवेजचे भारतीय वंशाचे पायल दिल्लीमधून दोहा येथील फ्लाईटमध्ये अॅडिशनल क्रू मेंबर म्हणून जात होते. या दरम्यान त्यांना हार्ट अॅटॅक आला. फ्लाईटमध्येच या पायलटचा मृत्यू झाला. कतार एअरवेजच्या आधी त्यांनी स्पाईसजेट, अलायन्स एअर आणि सहारा एअरलाईन्समध्ये काम केले आहे. डीजीसीएने दोन्ही पायलटच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -