Sharad Ponkshe : या मुर्खांना आजीचा इतिहास माहीत नाही तर सावरकरांचा कसा माहित असणार?

राहुल गांधी नक्की कोण? अभिनेते शरद पोंक्षे यांची वादग्रस्त टीका


मालेगाव : या मुर्खांना यांच्या आजीचा इतिहास माहीत नाही तर यांना सावरकरांचा कसा माहित असणार? अशी टिका अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी आपल्या व्याख्यानात केली.


एक तर तू गांधी नाही आणि सावरकर तर नाहीच नाही... हे काही ओरिजनल गांधी नसून ते तर खान आहेत... महात्मा गांधीचे (Mahatma Gandhi) वंशज नाही तर त्यांच्या आडनावाचा फायदा यांनी घेतला. फिरोज खान यांची पुढची ही पिलावळ असल्याचा यांचा इतिहास असल्याचे सांगत राहुल गांधी (Rahul Gandhi) हे खरंच गांधी आहेत का? त्यांचे मूळ नाव 'खान' असल्याची टिका अभिनेते शरद पोंक्षे यांनी केली.


भारतीय विचार मंच तर्फे प्रबोधन आणि जनजागृतीसाठी वीर सावरकरांच्या जीवनावरील व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अभिनेते शरद पोंक्षे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या व्याख्यानात शरद पोंक्षे यांनी गांधी घराण्यावर जोरदार टिका केली.


देशभरात काल देशाचा स्वातंत्र्य दिन (Independence Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मालेगाव शहरात देखील तिरंगा रॅलीसह विविध उपक्रम राबविण्यात आले.


मालेगाव येथील भारतीय विचार विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर ज्येष्ठ अभिनेते आणि सावरकर विचारांचे अभ्यासक शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे आयोजन सटाणा नाका भागातील श्री लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे उपस्थित होते. या व्याख्यानास शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्याचे पाहायला मिळाले.

Comments

Anamik    August 18, 2023 10:34 PM

मी काही गांधीवादी नाही. मी काँग्रेस प्रेमीही नाही. पण शरद तुझा अभ्यास कमी आहे रे. एकेरी उल्लेख करतोय कारण तुझी बुद्धी छोटी आहे. इतिहास त्यालाही माहीत नाही आणि तुला तरी कुठे माहीत आहे. तो आणि तू दोघेही सारखेच. बोलण्यापूर्वी नीट अभ्यास करत जा. आणि जर वाचनाची आवड नसेल तर कुणी जाणकार व्यक्तीचा सल्ला घेत जा. कपोलकल्पित विधान करून स्वतःचे हसू करून घेऊ नकोस. तुझा हितचिंतक

विलास    August 18, 2023 10:32 PM

मी काही गांधीवादी नाही. मी काँग्रेस प्रेमीही नाही. पण शरद तुझा अभ्यास कमी आहे रे. एकेरी उल्लेख करतोय कारण तुझी बुद्धी छोटी आहे. इतिहास त्यालाही माहीत नाही आणि तुला तरी कुठे माहीत आहे. तो आणि तू दोघेही सारखेच. बोलण्यापूर्वी नीट अभ्यास करत जा. आणि जर वाचनाची आवड नसेल तर कुणी जाणकार व्यक्तीचा सल्ला घेत जा. कपोलकल्पित विधान करून स्वतःचे हसू करून घेऊ नकोस. तुझा हितचिंतक

Add Comment

'Kumbh Bhakti Sangam' : नाशिकमध्ये शुक्रवारपासून कुंभ भक्ती संगम, मुख्यमंत्री करणार उद्घाटन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण झाली

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

Beed Crime : आष्टीत एकाच रात्री तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह; १२ जणांविरुद्ध गुन्हा

बीड : कायद्याची भीती न बाळगता आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे एकाच रात्री तब्बल तीन अल्पवयीन मुलींचे

MPSC paper leak : पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक, २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे