Saturday, December 14, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकSharad Ponkshe : या मुर्खांना आजीचा इतिहास माहीत नाही तर सावरकरांचा कसा...

Sharad Ponkshe : या मुर्खांना आजीचा इतिहास माहीत नाही तर सावरकरांचा कसा माहित असणार?

राहुल गांधी नक्की कोण? अभिनेते शरद पोंक्षे यांची वादग्रस्त टीका

मालेगाव : या मुर्खांना यांच्या आजीचा इतिहास माहीत नाही तर यांना सावरकरांचा कसा माहित असणार? अशी टिका अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी आपल्या व्याख्यानात केली.

एक तर तू गांधी नाही आणि सावरकर तर नाहीच नाही… हे काही ओरिजनल गांधी नसून ते तर खान आहेत… महात्मा गांधीचे (Mahatma Gandhi) वंशज नाही तर त्यांच्या आडनावाचा फायदा यांनी घेतला. फिरोज खान यांची पुढची ही पिलावळ असल्याचा यांचा इतिहास असल्याचे सांगत राहुल गांधी (Rahul Gandhi) हे खरंच गांधी आहेत का? त्यांचे मूळ नाव ‘खान’ असल्याची टिका अभिनेते शरद पोंक्षे यांनी केली.

भारतीय विचार मंच तर्फे प्रबोधन आणि जनजागृतीसाठी वीर सावरकरांच्या जीवनावरील व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अभिनेते शरद पोंक्षे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या व्याख्यानात शरद पोंक्षे यांनी गांधी घराण्यावर जोरदार टिका केली.

देशभरात काल देशाचा स्वातंत्र्य दिन (Independence Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मालेगाव शहरात देखील तिरंगा रॅलीसह विविध उपक्रम राबविण्यात आले.

मालेगाव येथील भारतीय विचार विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर ज्येष्ठ अभिनेते आणि सावरकर विचारांचे अभ्यासक शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे आयोजन सटाणा नाका भागातील श्री लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे उपस्थित होते. या व्याख्यानास शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्याचे पाहायला मिळाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. मी काही गांधीवादी नाही. मी काँग्रेस प्रेमीही नाही. पण शरद तुझा अभ्यास कमी आहे रे. एकेरी उल्लेख करतोय कारण तुझी बुद्धी छोटी आहे. इतिहास त्यालाही माहीत नाही आणि तुला तरी कुठे माहीत आहे. तो आणि तू दोघेही सारखेच. बोलण्यापूर्वी नीट अभ्यास करत जा. आणि जर वाचनाची आवड नसेल तर कुणी जाणकार व्यक्तीचा सल्ला घेत जा. कपोलकल्पित विधान करून स्वतःचे हसू करून घेऊ नकोस.
    तुझा हितचिंतक

  2. मी काही गांधीवादी नाही. मी काँग्रेस प्रेमीही नाही. पण शरद तुझा अभ्यास कमी आहे रे. एकेरी उल्लेख करतोय कारण तुझी बुद्धी छोटी आहे. इतिहास त्यालाही माहीत नाही आणि तुला तरी कुठे माहीत आहे. तो आणि तू दोघेही सारखेच. बोलण्यापूर्वी नीट अभ्यास करत जा. आणि जर वाचनाची आवड नसेल तर कुणी जाणकार व्यक्तीचा सल्ला घेत जा. कपोलकल्पित विधान करून स्वतःचे हसू करून घेऊ नकोस.
    तुझा हितचिंतक

Comments are closed.

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -