Monday, September 15, 2025

कोकणी माणसा जागा हो! जमिनी बाहेरच्यांना विकू नका!

कोकणी माणसा जागा हो! जमिनी बाहेरच्यांना विकू नका!

महाराष्ट्र सैनिकांनाही दक्ष राहण्याचे आवाहन

पनवेल : मुंबई गोवा महामार्ग झाल्यावर पण महाराष्ट्र सैनिकांनी लक्ष ठेवा की कोकणी माणसांच्या जमिनी कोणीही बळकावू नये हे बघा. कोकणात उद्योग आलेच पाहिजेत पण ते कोकणच्या निसर्गाची हानी करून नाही. निसर्गाचं इतकं अद्भुत दान आपल्या पदरात पडलं आहे त्याचा नाश करू देऊ नका, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले आहे.

कोकणामध्ये अनेक उत्तर भारतीय जमीनी विकत घेत आहेत. या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेताना त्यांनी भाजपाचे गोव्याचे मुख्यमंत्री आपल्याला गोव्याचा गुडगाव करायचा नाही असे म्हणाले असल्याचे सांगतात. जसे त्यांच्याकडे शेतजमीन शेतीसाठीच विकली जाते तशी स्थिती महाराष्ट्रात का नाही? असा सवालही राज यांनी विचारला आहे.

राज ठाकरे आज पनवेलमध्ये पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करण्याकरिता आले असता त्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून सरकारला खडे बोल सुनावले.

रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सुमारे अडीज हजार लोकांचे जीव गेले असल्याचे म्हटले आहे. कोकणात जमिनीचे व्यवहार कोणासाठी आणि कशासाठी होत आहेत? याकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. यावेळी कुंपण शेत खातंय… असा आरोपही त्यांनी केला.

Comments
Add Comment