Friday, July 19, 2024
HomeदेशIndia China: भारत-चीन यांच्यात कमांडर स्तरावर बैठक, या मुद्द्यांवर चर्चा

India China: भारत-चीन यांच्यात कमांडर स्तरावर बैठक, या मुद्द्यांवर चर्चा

नवी दिल्ली: भारत (india) आणि चीन (china) यांच्यातील सैन्यामध्ये झालेल्या १९व्या फेरीतील चर्चेनंतर कोणतेही ठोस यश मिळाले नाही. दोन्ही देशांच्या सैन्यांनी १३-१४ ऑगस्टला एलएसीजवळ भारतीय क्षेत्रात चुशुल-मोल्डोमध्ये कोर कमांडर स्तरावरील १९व्या फेरीतील चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानानुसार दोन्ही पक्षांनी पश्चिम क्षेत्रात एलएसीवर इतर मुद्द्यांवर सकारात्मक, रचनात्मक आणि गहन चर्चा केली. ही चर्चा सकाळी साडे नऊ वाजता सुरू झाली आणि तब्बल १० तास सुरू होती.

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार बैठकीदरम्यान चीन इतर मुद्द्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यास सहमत झाला. शेजारील देश आणि राजनायिक चॅनेल्सच्या माध्यमातून बातचीत कायम ठेवण्यावरही त्यांनी सहमती दर्शवली. दोन्ही देशांनी सीमावर्ती क्षेत्रांमध्ये शांतता कायम ठेवण्यास सहमती दाखवली.

याआधी सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले होते की दोन्ही देशांनी पूर्व लडाखमध्ये एलएसीवर सैनिकांच्या पुनरागमनाबाबतच्या संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. भारताने बैठकीत देपसांग आणि डेमचोकसह इतर ठिकाणी सैन्याचे पुनरागमन करण्याबाबत दबाव टाकला. सोबतच या बैठकीत तणाव कमी करण्याबाबतही चर्चा झाली.

याआधी एप्रिलमध्ये झाली होती १८वी फेरी

याआधी एप्रिल महिन्यात पूर्व लडाख येथे भारत आणि चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची १८वी फेरी पार पडली होती. या बैठकीचे नेतृत्व भारताचे लेफ्टनंट जनरल रशीम बाली यांनी केले होते. दुसरीकडे तितक्याच दर्जाच्या चीनच्या अधिकाऱ्याने त्यांची बाजू मांडली होती.

२०२० मध्ये गलवान येथे भारतीय सैन्य तसेच चीनच्या सैन्यांमध्ये हिंसक संघर्ष झाला. या संघर्षानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -