
मुंबई: भारतीय संघाला (team india) वेस्ट इंडिजविरुद्धच्या (west indies) टी-२० मालिकेत (t20 series) पराभव सहन करावा लागला. वेस्ट इंडिजने टीम इंडियाला ३-२ असे हरवले. दरम्यान, भारतीय संघाने वेस्ट इंडिजला कसोटी आणि वनडे मालिकेत हरवले. आता भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर (ireland tour) टी-२० सामन्यांची मालिका खेळत आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या मालिकेसाठी भारतीय संघ आयर्लंडमध्ये पोहोचला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झाला फोटो
सोशल मीडियावर या क्रिकेटर्सचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत भारतीय क्रिकेट संघाचा युवा क्रिकेटर तिलक वर्मा, यशस्वी जयसवाल आणि मुकेश कुमार दिसत आहेत. खरंतर, भारतीय खेळाडूंचा हा फोटो आयर्लंडमधील आहे. भारतीय खेळाडू वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर अमेरिकेतून आयर्लंडला पोहोचले आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता टीम इंडियाचा सलामीवीर सेल्फी क्लिक करत आहे . तर फोटोत तिलक वर्मा आणि मुकेश कुमारही आहेत.
The future stars of Indian cricket.
- Tilak & Jaiswal to Ireland...!!! pic.twitter.com/iUkhZKD5qV
— Johns. (@CricCrazyJohns) August 15, 2023
भारत - आयर्लंड मालिकेचे हे आहे वेळापत्रक
भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध ३ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १८ ऑगस्टला खेळवला जाईल. यानंतर मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे २० ऑगस्ट आणि २३ ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. भारत-आयर्लंड टी-२० मालिकेतील तीनही सामना डबलिन येथे खेळवले जाणार आहेत. या मालिकेतील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होतील.
या आयर्लंड दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह टीम इंडियाच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. या मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करणार आहे.