दिग्गज खेळाडूंचा समावेश
नवी दिल्ली : एक दिवसीय विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंडने टीमची घोषणा केली आहे. आयसीसी एक दिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या एक दिवसीय विश्वचषकाचे आयोजन १२ वर्षानंतर पुन्हा एकदा भारतात करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने ७ ऑगस्ट रोजी १८ खेळाडूंची नावे जाहीर केली होती. यात १८ खेळाडूंमधून १५ जण सामना खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंड टीमने देखील आपल्या संघाची घोषणा केली आहे. त्यात १५ खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
यावेळी इंग्लंडने हॅरी ब्रूक याला संधी दिलेली नाही. तसेच अनुभवी गोलंदाज जोफ्रा आर्चर याचाही समावेश करण्यात आलेला नाही. आर्चरचा कदाचित राखीव खेळाडू म्हणून समावेश केला जाऊ शकतो, असे टीम मॅनेजमेंटकडून सांगण्यात आले आहे.
बेन स्टोक्स खेळणार
इंग्लंडचा ऑलराउंडर बेन स्टोक्स एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुन्हा खेळणार आहे. स्टोक्सने जुलै २०२२मध्ये अखेरचा सामना खेळल्यानंतर एक दिवसीय क्रिकेटला रामराम केला होता. मात्र स्टोक्सने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. इंग्लंड विश्व चषका आधी न्यूझीलंड विरुद्ध टी -२० आणि वनडे सीरिज खेळणार आहे. स्टोक्स न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही खेळणार आहे.
एक दिवसीय विश्व चषकासाठी इंग्लंड टीम
जोस बटलर (कॅप्टन), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स.