Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीआयटी कंपन्यांकडून २.२६ लाख कर्मचाऱ्यांना नारळ

आयटी कंपन्यांकडून २.२६ लाख कर्मचाऱ्यांना नारळ

नवी दिल्ली : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकरकपात वेगाने सुरू आहे. २०२२च्या तुलनेत २०२३ मध्ये माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांनी ४० टक्के अधिक नोकरकपात केली आहे. २ लाख २६ हजार कर्मचाऱ्यांना या कंपन्यांनी घरी बसवले आहे.

अल्टइंडेक्स डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील परिस्थिती अधिक गंभीर आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात या कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरू आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२२ मध्ये कंपन्यांनी १ लाख ६४ हजार ७४४ कर्मचाऱ्यांना घरी बसवले होते. यंदा जानेवारीत ७५ हजार ९१२, फेब्रुवारीत ४० हजार नोकरकपात केली. जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता, महागाई, पुरवठा साखळीतील अडथळे, महसुलात होणारी घट यामुळे माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांनी २०२३ मध्ये मोठी नोकरकपात केली. यात गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट व ॲमेझॉन अशा बड्या कंपन्यांचा समावेश आहे. या सोबतच काही लहान कंपन्यांनीदेखील नोकरकपात केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -