
वर्ल्डकपमध्ये खेळणार अधिकाधिक खेळाडूंना आशिया कपसाठी संघात जागा मिळू शकते. या स्पर्धेद्वारे टीम मॅनेजमेंटला त्यांना परखण्याची संधी मिळेल. गेल्या वनडे वर्ल्डकपबाबत बोलायचे झाल्यास ७ खेळाडूंचा टीम इंडियातून पत्ता कट झाला आहे. म्हणजेच हे खेळाडू पुन्हा दिसणार नाहीत. यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह ३ विकेटकीपरही आहेत. धोनीने निवृत्ती घेतली आहे तर ऋषभ पंत दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. दिनेश कार्तिक संघात स्थान बनवण्याच्या स्पर्धेत नाही. वर्ल्डकपचे सामने ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरदरम्यान रंगणार आहेत.
धवनने ठोकले होते शतक
शिखर धवन २०१९ वनडे वर्ल्डकपमधील २ सामन्यात खेळला होता. त्याने या सामन्यात एका शतकासह १२५ धावा केल्या होत्या. मात्र यानंतर तो अंगठा फ्रॅक्चर झाल्याने स्पर्धेबाहेर गेला. याशिवाय केदार जाधवने ५ डावांत ८०, विजय शंकरने ३ डावांत ५८ तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ६ सामन्यात १० विकेट घेतल्या होत्या. २०१९च्या वर्ल्डकपमध्ये महेंद्रसिंग धोनीने ८ डावांत २७३, ऋषभ पंतने ४ डावांत ११६ तर दिनेश कार्तिकने २ डावांत १४ धावा केल्या होत्या.
रोहितची ५ शतके
रोहित शर्मा या वर्ल्डकपमध्ये कर्णधार म्हणून उतरणार आहे. गेल्या वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात तो खेळण्यास उतरला होता. मात्र सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभवास सामोरे जावे लागले होते. गेल्या वर्ल्डकपमध्ये रोहित ५ शतके ठोकली होती.