Monday, May 5, 2025

देशमहत्वाची बातमी

तांदूळ द्या, टोमॅटो घ्या, या देशाने भारताकडे केलीये ही मागणी

तांदूळ द्या, टोमॅटो घ्या, या देशाने भारताकडे केलीये ही मागणी

मुंबई: सध्या देशात सगळीकडेच टोमॅटोचे (tomato rate) दर प्रचंड भाव खात आहेत. टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या वाढत्या किंमतीच्या हाहाकारातच आता भारताच्या मदतीसाठी शेजारील देश नेपाळ (nepal) पुढे आला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की देशात टोमॅटोची पूर्तता करण्यासाठी नेपाळमधून मोठ्या प्रमाणात टोमॅटो आयात (tomato import) केला जात आहेत. नेपाळमधून आयात केले जाणारे टोमॅटो लवकरच येत आहेत. हे टोमॅटो देशात पोहोचताच अनेक राज्यांमध्ये टोमॅटो पाठवले जातील.

नेपाळमधून आयात टोमॅटो उत्तर भारतातील राज्यांमध्ये पाठवले जातील. खासकरून हे टोमॅटो उत्तर प्रदेशात पाठवले जातील. देशात टोमॅटोच्या किंमती जुलै महिन्यात वाढण्यास सुरूवात झाली आणि एक वेळ अशी आली की टोमॅटो तब्बल २५० रूपये किलो इतके वाढले. काही ठिकाणी तर टोमॅटोचे दर ३०० रूपये किंलोपर्यंत वाढले होते. सरकारने लोकांना यापासून दिलासा देण्यासाठी सबसिडीवर टोमॅटो विकण्यास सुरूवात केली. सबसिडी असलेल्या टोमॅटोचे दर सध्या कमी होऊन ५० रूपये इतके झाले आहेत यामुळे सामान्य लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

भारताला पहिल्यांदा आयात करावे लागत आहेत टोमॅटो

आऊटलूकच्या एका रिपोर्टनुसार टोमॅटोच्या वाढत्या किंमतीदरम्यान भारत पहिल्यांदाच टोमॅटो आयात करत आहेत. शुक्रवारी नेपाळच्या कृषीमंत्रालयाच्या प्रवक्ता शबनम शिवकोटी यांनी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना सांगितले की नेपाळ भारताला टोमॅटोसारखी भाजी पाठवण्यास इच्छुक आहे. मात्र त्यासाठी भारताला दुसऱ्या गरजेच्या सुविधा द्याव्या लागतील. नेपाळमध्ये काठमांडू, ललिपूर आणि भक्तपूर येथे मोठ्या प्रमाणात टोमॅटोची शेती केली जाते.

टोमॅटोच्या बदली तांदूळ

नेपाळचे वृत्त द काठमांडू पोस्टच्या बातमीनुसार टोमॅटो निर्यात करत असलेल्या नेपाळ सरकारने भारत सरकारला एक पत्र लिहून आग्रह केला आहे की ते नेपाळला भारत आणि साखर निर्यात करावी त्या बदल्यात ते भारताला दीर्घकाळ टोमॅटो निर्यात करतील. भारत सरकारने डोमेस्टिक स्तरावरील किंमती नियंत्रित राखण्यासाठी २० जुलैला गैर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. या बंदीचा परिणाम अमेरिका, ऑस्ट्रेलिया सह भारताचा शेजारील देश नेपाळवरही परिणाम झाला आहे.

Comments
Add Comment