Saturday, May 10, 2025

देशमहत्वाची बातमी

हिमाचलमध्ये पावसाचा कहर, ५० हून अधिकांचा मृत्यू

हिमाचलमध्ये पावसाचा कहर, ५० हून अधिकांचा मृत्यू

शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने झालेल्या दुर्घटनेमुळे तब्बल ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील १४ लोकांचा मृत्यू सिमलामध्ये झालेल्या भूस्सखलनाच्या दोन घटनांमध्ये झाला आहे. मुसळधार पावसामुळे या भागातील काही ठिकाणी भूस्सखलन ाले. यामुळे अनेक रस्ते बंद झाले तर काही घरे कोसळली. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.



शिव मंदिरात भूस्सखलन


सिमल्यामधील समर हिल परिसरातील शिवमंदिरात भूस्सखलन झाल्याने मोठ्या प्रमाणात लोक तेथे मलब्याखाली दबले गेले. श्रावण महिना सुरू असल्याने यावेळी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शिमल्यात भूस्सखलनाच्या दोन घटनांमध्ये कमीत कमी १४ लोकांचा मृत्यू झाला. यात समर हिल परिसरातील शिव मंदिर आणि फागली भागातील आणखी एका ठिकाणी झालेल्या भूस्सखलनानंतर मलब्याखालून ९ शव बाहेर काढण्यात आले.



९ जिल्ह्यांमध्ये पिवळा अलर्ट


राज्याच्या आपतकालीन विभागाच्या माहितीनुसार राज्यातील ७५२ रस्ते बंद करण्यात आले आहेत. हवामान विभागाने सोमवापी कुल्लू, किन्नोर आणि लाहोल स्पिती सोडून राज्यातील १२ जिल्ह्यांपैकी ९ जिल्ह्यात मंगळवारी पिवळा अलर्ट जाहीर केला आहे.



सोलनच्या जादोनमध्ये आभाळ फाटले, एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलन जिल्ह्यातील जादोन गावात आभाळ फाटल्याने रविवारी रात्री एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आभाळ फाटल्याने दोन बंगले वाहून गेले. या दुर्घटनेत सहा जणांना वाचवण्यात यश आले. मात्र सात जणांचा म-त्यू झाला.



अमित शहांनी व्यक्त केला शोक


हिमाचल प्रदेशात झालेल्या दुर्घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला. तसेच बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून ज्या ठिकाणी भूस्सखलन झाले आहे तेथे दबलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली


Comments
Add Comment