
नवी दिल्ली: संपूर्ण देशात आज ७७व्या स्वातंत्र्यदिनाचा (independence day) उत्साह आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण (flag hoisting) केले. यानंतर नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहे. त्यांनी देशातील १४० कोटी जनतेला संबोधित करताना म्हटले की हा देश म्हणजे एक कुटुंब आहे.
Addressing the nation on Independence Day. https://t.co/DGrFjG70pA
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2023
aren
संपूर्ण देश मणिपूरसोबत
यावेळी त्यांनी आपल्या भाषणात मणिपूरचा उल्लेख केला. तेथे झालेली हिंसा ही दुख:द आहे असेही ते म्हणाले तसेच यावेळेस संपूर्ण देश मणिपूरसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही आठवड्यात तेथे झालेल्या हिंसेमुळे अनेकांना आपले प्राण नाहक गमवावे लागले. माता-भगिनींच्या सन्मालाही ठेच पोहोचवली गेली. मात्र काही दिवसांपासून तेथून शांततेच्या बातम्या येत आहेत. मणिपूरच्या लोकांनी गेल्या काही दिवसांपासून जी शांतता कायम ठेवली आहे त्यांनी हे असेच सुरू ठेवावे. राज्य आणि केंद्र सरकार मिळून या समस्येचे निराकरण करण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे.
युवा शक्ती सामर्थ्यवान
पंतप्रधान मोदींनी सांगितले की आज युवा पिढी जे काही करत आहे त्याचा प्रभाव १००० वर्षांपर्यंत देशात दिसेल. देशात तरुणांना हे सौभाग्य मिळाले आहे. त्यांनी ही संधी गमावता कामा नये. युवा शक्तीमध्ये सामर्थ्य आहे आणि आमचे धोरण त्यांना पाठिंबा देणे आहे.
नैसर्गिक आपत्तीमध्ये जीव गमावलेल्या व्यक्तींप्रती व्यक्त केला शोक
पंतप्रधान म्हणाले देशातील विविध ठिकाणी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे. ज्या कुटुंबासोबत हे घडले त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. राज्य आणि केंद्र सरकारकडून या संकटांचा सामना करत वेगाने विकासाच्या दिशेने जात आहे. असा विश्वास मी तुम्हाला देतो.