Friday, April 25, 2025
Homeताज्या घडामोडीGovernment Guest of Japan : नरेंद्र मोदींनंतर आता देवेंद्र फडणवीस जपानचे शासकीय...

Government Guest of Japan : नरेंद्र मोदींनंतर आता देवेंद्र फडणवीस जपानचे शासकीय अतिथी

उपमुख्यमंत्र्यांना जपानकडून मिळाला बहुमान

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामुळे महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा उंचावली गेली आहे. याचे कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना जपानकडून शासकीय अतिथी (Government Guest of Japan) हा बहुमान मिळाला आहे. हा मान यापूर्वी देशाचे विद्यमान पंतप्रधान तथा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना मिळाला होता. फडणवीसांना शासकीय अतिथी असा विशेष दर्जा मिळाल्याने त्यांचं खूप कौतुक होत आहे.

जपान सरकारने देवेंद्र फडणवीस यांना शासकीय अतिथी असा दर्जा देऊन आमंत्रित केलं आहे. फडणवीस येत्या २० ऑगस्टपासून जपानच्या दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांना २०१३ साली हा सन्मान मिळाला होता. मागे देवेंद्र फडणवीसांनी मॉरिशिसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. हा आपल्यासाठी बहुमान असल्याचं त्यांनी नमूद केलेलं. आता जपान सरकारने त्यांचा सन्मान केला आहे.

जपानमध्ये २० ते २५ ऑगस्ट अशा या दौऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस जपान-इंडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत. तसेच विदेशी गुंतवणूकदारांसमवेत चर्चा करणार आहेत. ते परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री, पर्यटनमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी हा दौरा महत्त्वाचा समाजला जातो आहे. विशेष म्हणजे सोनी, एनटीटी, समिटोमो यासारख्या नामवंत कंपन्यांसोबत फडणवीसांच्या बैठका घेतील. जपान दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस बुलेट ट्रेन आणि टोकियो मेट्रो प्रकल्पांना भेटी देऊन कार्यपद्धतीचा अभ्यास करणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -