Saturday, May 10, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Big Boss OTT2: एल्विश यादवने रचला इतिहास, वाईल्ड कार्ड स्पर्धक जिंकला स्पर्धा

Big Boss OTT2: एल्विश यादवने रचला इतिहास, वाईल्ड कार्ड स्पर्धक जिंकला स्पर्धा

मुंबई: सलमान खानचा (salman khan)चा शो बिग बॉस ओटीटी २ (BIg Boss OTT2) अनेक दिवसांपासून चर्चेत होता. लोकांना या शोच्या ग्रँड फिनालेची उत्सुकता होती. अखेर या स्पर्धेचा ग्रँड फिनाले पार पडला. शोला १४ ऑगस्टला आपला विजेता मिळाला. प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवने ही स्पर्धा जिंकत इतिहास रचला.


यात पहिल्यांदा असे घडले की एखाद्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाला बिग बॉसची विजयी ट्रॉफी मिळाली. त्याला बिग बॉस ओटीटी २ची ट्रॉफी आणि २५ लाख रूपये मिळाले. या स्पर्धेत अभिषेक मल्हानही होता. सलमान खानच्या या शोमध्ये अभिषेक पहिला रनर अप ठरला. तर मनीषा राणी दुसरी रनर अप ठरली.


 


एल्विश यादवने या हंगामात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री घेतली होती. बिग बॉसच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलेय की एखादा वाईल्ड कार्ड स्पर्धकाने हा शो जिंकला आहे. एल्विश यादवने आपली ही ट्रॉफी अभिषेक मल्हान आणि मनीषा रानी यांना अर्पित केली. बिग बॉस ओटीटीच्या टॉप ५मध्ये एल्विश यादवसह अभिषेक मल्हान, मनीषा रानी, बेबिका धुर्वे आणि पुजा भट्ट होती.


१७ जूनला बिग बॉस ओटीटीचे हे दुसरे पर्व सुरू झाले होते. यात १६ स्पर्धक सहभागी होती. हे सगळेच स्पर्धक लोकप्रिय होते.

Comments
Add Comment