मुंबई : गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बॉलीवूड (Bollywood) गाजवलेल्या आणि चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या बॉलीवूडच्या खिलाडीला अखेर भारतीय नागरिकत्व (Indian Citizenship) मिळाले आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar) हा यापूर्वी कॅनडाचा (Canada) नागरिक होता, त्यामुळे त्याच्यावर काही लोकांकडून अनेकदा टीकाही झाली होती. मात्र आता अधिकृत सरकारी कागदपत्रांचे फोटोज आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत आजच्या स्वातंत्र्यदिनादिवशी त्याने ही खुशखबर दिली आहे.
अक्षयने ट्विटरवर (Twitter post) एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याचं नाव अक्षय हरिओम भाटिया असं आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “दिल और सिटीझनशिप, दोनो हिंदुस्थानी. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! जय हिंद.” त्याच्या चाहत्यांनी त्याचे अभिनंदन करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षयचा नुकताच ओएमजी २ (OMG 2) चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आगामी काळात तो टायगर श्रॉफ सोबत बडे मियाँ छोटे मियाँ या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात देखील दिसणार आहे. अक्षय त्याच्या हिट कॉमेडी चित्रपट हाऊसफुलच्या पाचव्या भागासाठी रितेश देशमुखसोबत पुन्हा एकत्र येणार आहे. तो बहुप्रतिक्षित हेरा फेरी ३ मध्ये देखील दिसणार आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…