
ट्विटर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली खुशखबर
मुंबई : गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बॉलीवूड (Bollywood) गाजवलेल्या आणि चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या बॉलीवूडच्या खिलाडीला अखेर भारतीय नागरिकत्व (Indian Citizenship) मिळाले आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar) हा यापूर्वी कॅनडाचा (Canada) नागरिक होता, त्यामुळे त्याच्यावर काही लोकांकडून अनेकदा टीकाही झाली होती. मात्र आता अधिकृत सरकारी कागदपत्रांचे फोटोज आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत आजच्या स्वातंत्र्यदिनादिवशी त्याने ही खुशखबर दिली आहे.
अक्षयने ट्विटरवर (Twitter post) एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याचं नाव अक्षय हरिओम भाटिया असं आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “दिल और सिटीझनशिप, दोनो हिंदुस्थानी. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! जय हिंद." त्याच्या चाहत्यांनी त्याचे अभिनंदन करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Dil aur citizenship, dono Hindustani.
Happy Independence Day!
Jai Hind! 🇮🇳 pic.twitter.com/DLH0DtbGxk
— Akshay Kumar (@akshaykumar) August 15, 2023
अक्षयचा नुकताच ओएमजी २ (OMG 2) चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आगामी काळात तो टायगर श्रॉफ सोबत बडे मियाँ छोटे मियाँ या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात देखील दिसणार आहे. अक्षय त्याच्या हिट कॉमेडी चित्रपट हाऊसफुलच्या पाचव्या भागासाठी रितेश देशमुखसोबत पुन्हा एकत्र येणार आहे. तो बहुप्रतिक्षित हेरा फेरी ३ मध्ये देखील दिसणार आहे.