Wednesday, July 24, 2024
Homeमहत्वाची बातमीAjit Pawar : 'अरे वेड्या, मी लपून नाही, जेवणाचे आमंत्रण होते म्हणून...

Ajit Pawar : ‘अरे वेड्या, मी लपून नाही, जेवणाचे आमंत्रण होते म्हणून गेलेलो…’

शरद पवारांसोबतच्या गुप्त बैठकीवर अजित पवार संतापले

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे. याबाबत एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता अजित पवार संतापले. म्हणाले, ‘अरे वेड्या, मी लपून नाही, जेवणाचे आमंत्रण होते म्हणून गेलो होतो. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी माध्यमांना गुप्त भेटीच्या चर्चेवर माहिती दिली.

पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे. दोघेही शनिवारी दिवसभर पुण्यात होते. त्यामुळे या चर्चेला पुष्टी मिळत होती. जयंत पाटील हेही यावेळी उपस्थित होते. या बैठकीवरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. या चर्चांवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: त्या दिवशी काय झालं याची माहिती दिली.

अजित पवार म्हणाले, मी बैठकीला लपून गेलेलो नाही, मी उघड फिरणारा कार्यकर्ता आहे. मी उद्या कोणाच्याही घरी गेलो तरी कधी बाहेर पडायचं हे मी ठरवणार, असे अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले.

“उद्योगपती अतुल चोरडीया यांचे वडील शरद पवार यांचे क्लासमेंट होते. त्या दिवशी पवार साहेब व्हीएसआयचा कार्यक्रम संपवून येणार होते. मी चांदणी चौकातील कार्यक्रम संपवून येणार होतो. त्या दिवशी शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटीलही होते. चोरडीया यांनी आम्हाला जेवायला बोलावलं होतं म्हणून आम्ही तिथे गेलो होतो, असेही अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, पुण्यातील भेटीला कोणीही वेगळं वळण देऊ नये. आम्ही नात्यातील आहे अशा भेटी होत राहणार. त्यामुळे या संदर्भात संभ्रम निर्माण करु नका, असेही पवार म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -