Sunday, July 14, 2024
Homeदेश77th Independence Day: पंतप्रधान मोदी सलग १०व्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला करणार संबोधित

77th Independence Day: पंतप्रधान मोदी सलग १०व्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला करणार संबोधित

नवी दिल्ली: भारताचा आज ७७वा स्वातंत्र्यदिन. ज्या देशभक्तांनी आपले रक्त सांडून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या आठवणीचा आजचा दिवस. संपूर्ण देश या देशभक्तीच्या रंगात आज रंगला आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर होणाऱ्या ७७व्या स्वातंत्र्य दिनाची तयारीही पूर्ण झाली आहे. येथे आज पंतप्रधान मोदी ध्वजारोहण करतील आणि देशाला संबोधित करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सलग १०व्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी लाल किल्ल्यावरील त्यांचे हे शेवटचे भाषण असेल.लाल किल्ल्यावर पोहोचताच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट आणि संरक्षण सचिव गिरिधर अरामने त्यांचे स्वागत करतली. पीएम यांच्या गार्ड ऑफ ऑनर दलात सेना, नौसेना आणि दिल्ली पोलिसांचे एकएक अधिकारी सामील असतील.

असा असेल कार्यक्रम

सकाळी ७.०६ वाजता – पंतप्रधान राजघाट येथे पोहोचल्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण करणार
सकाळी ७.०८ वाजता – संरक्षण राज्य मंत्री पोहोचतील.
सकाळी ७.११ वाजता – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पोहोचतील.
सकाळी ७.१८ वाजता – पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर आगमन. आणि त्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार.
सकाळी ७.३० वाजता पंतप्रधान ध्वजारोहण करतील. यानंतर २१ तोफांची सलामी दिली जाईल.
सकाळी ७.३३ वाजता – पंतप्रधान देशाला संबोधित करतील.

सकाळी साडेसात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरंगा फडकावल्यानंतर देशाला संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वार्षिक कार्यक्रमात सरकार आपले रिपोर्ट कार्ड, तसेच प्रमुख योजनांचे अनावरण आणि देशासाठी आपला भावी दृष्टिकोन या मुद्द्यांवर बोलतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -