Thursday, November 7, 2024
HomeदेशSupreme Court : ज्ञानवापीच्या धर्तीवर मथुरेत सर्वेक्षणाची मागणी, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Supreme Court : ज्ञानवापीच्या धर्तीवर मथुरेत सर्वेक्षणाची मागणी, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

लखनऊ : उत्तर प्रदेशातील मथुरेतील वादग्रस्त शाही मशीद इदगाह परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी करत श्री कृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे.

मथुरेतील श्री कृष्ण जन्मभूमी शाही ईदगाहसंदर्भात सुरू असलेल्या जमिनीच्या वादाला नवे वळण मिळाले आहे. त्याचवेळी याचिकाकर्ते आशुतोष पांडे यांनी आरोप केला आहे की, शाही मशीद इदगाह व्यवस्थापन समितीसारख्या संस्था मालमत्तेचे नुकसान करण्याचे काम करत आहेत.

श्री कृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टचे प्रतिनिधित्व करणारे आशुतोष पांडे हे सिद्ध पीठ माता शाकुंभरी पीठाधीश्वर भृगुवंशी यांचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष रजा याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की मथुरेतील अशा बांधकामाला मशीद मानता येणार नाही. याशिवाय १९६८च्या कराराच्या वैधतेच्या विरोधात युक्तिवाद करताना याला फसवणूक म्हटले आहे.

शाही मशीद इदगाह व्यवस्थापन समितीसारख्या संस्था मालमत्तेचे नुकसान करत असल्याचा आरोप भृगुवंशी आशुतोष पांडे यांनी केला आहे. मंदिरांचे खांब आणि चिन्हांचे नुकसान झाल्याचा त्यांचा दावा आहे. जनरेटरचा वापर करण्यात आला असून, त्यामुळे भिंती आणि खांबांचे बरेच नुकसान झाले आहे.

याचिकाकर्त्याने कॅम्पसमध्ये होणाऱ्या प्रार्थना आणि इतर उपक्रमांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. आशुतोष पांडे यांनीही मालमत्ता नोंदणीतील विसंगतींबाबत चिंता व्यक्त केली आहे. इदगाह नावाने जमिनीची अधिकृत नोंदणी करता येणार नाही, असा त्यांचा युक्तिवाद आहे. कारण त्याचा कर कटरा केशव देव मथुरा या नावाने वसूल केला जात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -