साठ वर्षांपूर्वी मुंबईत राबविली ‘ड्रीम मरोळ’ संकल्पना

Share

निलन हरिश्चंद्र मुरंजन

आमचं मत विकासाला असे म्हणत निवडणुका येतात आणि जातात. मग सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात विकासासाठी संघर्ष सुरू होतात. सत्ताधारी विविध योजना आखतात, बजेटमध्ये तरतूद होते, योजनांच्या अंमलबजावणीला सुरुवात होते. तरी विकासाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत अपेक्षित प्रभावीपणे पोहोचत नाही आणि त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात होते. सामान्य माणूस भांबावून जातो. त्याला अपेक्षित असलेल्या सुधारणा त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत. सत्ताधारी योजना आखतात; परंतु सुधारणांची गती मात्र संथच राहाते, हे असे का होते?

सुधारणांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत असताना नियम व अटींचे कठोर पालन करावे लागते, नियम आणि अटींचे पालन करताना त्यामध्ये एक अडसर अदृष्य अडसर उभा असतो. हा अडसर आहे ‘माणुसकीचा, माणुसकीच्या नावाखाली योजनांची अंमलबजावणी स्थगित होते. अगदी आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभव सुद्धा हेच सांगतो, रस्त्यावरून चालताना पदपथावरून चालावे, या नियमाची आपण अंमलबजावणी करू शकत नाही, पदपथावर छोटे-छोटे व्यावसायिक सआपला व्यवसाय थाटून बसलेले असतात. पोटापाण्यासाठी गरीब व्यवसाय करतात म्हणून महापालिका अधिकारी त्यांना पदपथावरून हुसकावून लावू शकत नाहीत. एखाद्या अधिकाऱ्याने असा प्रयत्न केलाच तर त्याला ‘बाहुबली’ नेता आडवा येतो. त्याच्या कॉलरला पकडून त्याला ‘माणुसकीची’ शिकवण देतो. वेळप्रसंगी त्याला धक्काबुक्की आणि मारहाणीलाही सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत महापालिका अधिकारी नियम व अटी डावलून ‘चिरीमिरी’ स्वीकारून गरिबाला पदथावर व्यवसाय करण्यास परवानगी देतो. अर्थात त्याच्या पदपथावर व्यवसाय करण्याच्या बेकायदेशीर प्रकाराकडे दुर्लक्ष करतो.

सर्वांना समाधान देणाऱ्या मार्गाचा अवलंब करतो. सामान्य माणूस पदपथावरून सुरक्षितपणे चालण्याच्या हक्काला मुकतो. माणुसकीचा विजय होतो मात्र विकासाच्या मार्गात मोठा अडसरच निर्माण होतो. ‘माणुसकी आणि विकास’ दोन्ही समतोलपणे पुढे घेऊन जाण्यासाठी अभ्यासू नेत्यांची गरज आहे. अशा अभ्यासू नेत्यांना नेतृत्वाची धुरा सांभाळण्याची संधी सर्व राजकीय पक्ष देतील का? सामान्य मतदारांनी सुद्धा आता भावनेच्या आहारी न जाता सुबुद्धपणे आपला मतदानाचा हक्क बजावला तर विकासाची गंगा सामान्य माणसाच्या दारी पोहोचायला वेळ लागणार नाही.

“व्यक्तिगत स्वार्थ आणि भ्रष्टाचार हा विकासाच्या मार्गातील आणखी एक मोठा अडसर. नेत्याची निवड करताना सामान्य माणूस त्याच्या श्रीमंतीचा विचार करतो, त्याच्या कर्तृत्वाचा विचार करतो, त्याच्या राजकीय खानदानीचा विचार करतो, मात्र त्याची बुद्धिमता, नि:स्वार्थ सेवाभावी वृत्ती आणि विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची पात्रता याच्याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतो. परिणामी भूलभुलैया निर्माण करणाऱ्या वाचाळवीरांची आम्ही नेतेपदी निवड करतो. आमची विकासाची गंगा वहाते मात्र ती नेत्याच्या दारात थबकते आणि हळुवारपणे सामान्य माणसाच्या दारात नेत्यांच्या सोयीनुसार वहाते. गेल्या साठ वर्षांच्या कालावधीत मिठी नदीच्या ‘मरोळगांव’ या गावाचा विकासाकडून अधोगतीकडे प्रवास सुरू आहे.

स्वच्छ, सुंदर निर्मळ, मिठी नदीच्या तीरावर साठ वर्षांपूर्वी मरोळ गावातील लोक सुखासमाधानाने राहात होती. मिठी नदीच्या दोन्ही तीरावर आंबा, काजू, चिकू, फणस, पपई अशा विविध फळांच्या बागा बहरल्या होत्या. या फळांनी आपल्या नावांचासुद्धा लोकांच्या मनात ठसा उमटविला होता. आंबावाडी, चिकूवाडी, काजूवाडी अशा फळांच्या नांवानी जागांची ओळख निर्माण केली होती. हिरवीगार शेती सुद्धा डुलत होती. शाळकरी मुले यथेच्छपणे मिठी नदीत डुबक्या मारायची.

पोर्तुगिजांनी या टुमदार गावावर आपला प्रभाव पाडायला सुरुवात केली होती. आदिवासी शेतकरी कुटुंबीयांनी त्यांच्या आमिषाला बळी पडून ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. सुशिक्षित ब्राह्मण कुटुंब सुद्धा या धर्मांतराच्या यात्रेत सहभागी झाली आणि मुंबईतले पहिले मोठं धर्मांतर सर्वप्रथम इथे संपन्न झाले. ख्रिस्ती धर्माची प्रार्थनास्थळे इथे उभी राहिली. हिन्दू, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मिय मरोळ गांवात गुण्यागोविंदानी राहू लागली. चर्चबरोबरच मिशनऱ्यांच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा उभ्या राहिल्या. पेहराव, सण, आचार-विचारात फरक पडला. मात्र सर्वधर्मिय गुण्यागोविंदाने आणि एकमेकांविषयी आदर भावनेने राहात होती.

“मिठी नदी ही मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. मिठी नदी विहार झोन परिसरात उगम पावते व दक्षिणेकडे, वांद्रे कुर्ला संकुलमधून वहाते आणि शेवटी माहीम येथे अरबी समुद्रात मिळते. मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती होण्यापूर्वी या भू-भागाचे नाव साष्टी बेटे होते. इसवी सन १७७१-७२ पर्यंत हा प्रदेश पोर्तुगीज अंमलाखालील गोवा राज्यात समाविष्ट होता. १७७१-७२ नंतर या प्रदेशावर ब्रिटिश साम्राज्याचा अधिकार आला. इसवी सन १९२० मध्ये साष्टी तालुक्याची दक्षिण साष्टी व उत्तर साष्टी अशा दोन तालुक्यात विभागणी करण्यात आली. ८४ गावे (वांद्रे ने दहिसर व कुलती मुलुंड) असलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. यावेळी ठाणे जिल्ह्यातील काही गांवे वगळून मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. इसकी सन १९६२ मध्ये बोरिवली तालुक्यातील काही गांवे व दक्षिण साष्टी तालुक्यातील काही गावे वेगळी करून अंधेरी व कुर्ला तालुक्याची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून मुंबई उपनगर जिल्ह्यात अंधेरी, बोरिवली व कुर्ला असे तीन तालुके आहेत. १ डिसेंबर १९४० पासून मुंबई उपनगर जिल्हा अस्तित्वात आला.

सन १९६२ पर्यंत मरोळगावात शेती हा मुख्य व्यवसाय होता. मिठी नदीच्या स्वच्छ सुंदर पाण्यामुळे येथे शेती व्यवसाय चांगला बहरला होता. फळबागांच्या वाड्या फळा फुलांनी डवरल्या होत्या. जमीनदारांनी बंगलीवजा घरे बांधून सुखा-समाधानाने राहात होते. सन १९६२ पासून हा भाग ‘औद्योगिक क्षेत्र’ म्हणून जाहीर झाला आणि मरोळगांवचे गावपण दबक्या पावलांनी नाहीसे होत गेले. एम. आय. डी. सी. माध्यमातून औद्योगिक इमारती उभ्या राहू जागल्या. अनेक मोठे कारखाने आले. कारखानदारीचा विकास जितक्या गतीने झाला तितक्या गतीने सुधारणा मात्र झाल्या नाहीत. या सुधारणा घडवून आणण्यासाठी योग्य आखणी झाली नाही किंवा त्याची अंमलबजावणी कडव्या शिस्तीने झाली नाही. वेळेनुसार आलेल्या संधीचा फायदा उचलणारे राजकीय नेते आणि त्यांना साथ देणारे ‘बाहुबली’ यांनी सार्वजनिक सुधारणा घडवून आणण्यापेक्षा व्यक्तिगत फायद्याकडे लक्ष दिले आणि दुर्दैवाने महापालिका अधिकारी, तहसीलदार कार्यालतील अधिकारी, पोलीस अधिकारी या सर्वांनी राजकीय नेत्यांशी हातमिळवणी करून व्यक्तिगत स्वार्थ साधला. मात्र विकासाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचू दिली नाही. आता मात्र समाजातील सुशिक्षित वर्ग जागरूक झाला आहे, सामान्य लोकांना सुद्धा आपल्या गरजा लढा देऊन मिळवाव्या लागतील याची जाणीव झाली आहे. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करणारे, लाथाळ्या झाडणाऱ्या तथाकथित नेत्यांपासून लांब राहून फक्त समाज सुधारणा घडविण्याची मनीषा बाळगणाऱ्यांनी एकजुटीने उभे राहून समाज- सुधारणा घडविणे ही काळाची गरज आहे.

मरोळगांवातील आबालवृद्ध स्त्री-पुरुष ‘ड्रीम मरोळ’ या नावाने आपल्या गावात सुधारणा घडवून आणण्यासाठी एकत्रित आले आहेत. प्लास्टिक पिशव्या स्वतः वापरायच्या नाहीत आणि दुकानदारांना विनंती करून त्यांनासुद्धा त्याचा वापर करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न या मंडळींनी सातत्याने सुरू ठेवला आहे. प्रत्येक हाऊसिंग सोसायटीमध्ये कापडी पिशव्या पुरवण्याचा उपक्रम राबवला जात आहे. या कार्यासाठी एकत्रित आलेल्या स्त्री-पुरुषामध्ये कुणीही नेते नाहीत, तर प्रत्येक व्यक्ती ‘कार्यकर्ता’ आहेत त्यामुळे सर्वजण उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.

रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग आठवडाभर पडून राहतात. आता मात्र सोसायट्यांमधून सुशिक्षित नागरिक वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या कचऱ्याचे ढीग तत्काळ हटविण्यासाठी सक्रिय झाले आहेत. मोहोल्यातून कार्यकर्ते एकत्रितपणे आपले मोहल्ले स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शालेय विद्यार्थी परीक्षा संपल्याने या मोहिमेत सक्रिय सहभागी होत आहेत. ही चळवळ आता प्रत्येक सोसायटी आणि घराघरातून सातत्याने सक्रिय राहिली पाहिजे. आतापर्यंत सुशिक्षित म्हणवणारे फक्त सल्लागाराची भूमिका पार पाडत होते. आता सर्व सुशिक्षित, निवृत्त अधिकारी, तरुण उद्योजक एकदिलाने, एकजुटीने स्वच्छता मोहिमेमध्ये आणि महापालिकेच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ‘ड्रीम मरोळ’च्या माध्यमातून सक्रिय झाले आहेत. मरोळ गावातील विकासाची गंगा सामान्यांपर्यंत पोहोचणे आता नक्कीच शक्य होईल असा विश्वास वाटतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

17 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

3 hours ago