Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

Rahul Gandhi: खासदारकी मिळाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदा वायनाडच्या दौऱ्यावर

Rahul Gandhi: खासदारकी मिळाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदा वायनाडच्या दौऱ्यावर

मुंबई: काँग्रेस नेता राहुल गांधी शनिवारी १२ ऑगस्टला दोन दिवसांच्या आपल्या खासदार क्षेत्र वायनाडच्या दौऱ्यावर जात आहेत. नुकतेच त्यांना संसदेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. त्यानंतर त्यांचा वायनाडचा हा पहिलाच दौरा आहे. राहुल गांधीच्या या दौऱ्यामुळे काँग्रेसची केरळ युनिट उत्साहात आहे.

मोदी आडनावावरुन झालेल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेवर स्थगिती दिल्यानंतर सोमवारी ७ ऑगस्टला राहुल गांधींना लोकसभेचे सदस्यत्व देण्यात आले होते. यानंतर ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले होते. तेथे त्यांनी मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत भाग घेतला होता तसेच मणिपूर प्रकरणावरून सरकारला घेरले होते.

राहुल गांधींना मोदी आडनावावरून झालेल्या प्रकरणात सीजेएम कोर्टाने या वर्षी २३ मार्चला दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. चार महिन्यानंतर ४ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेवर स्थगिती देण्याचे आदेश दिले होते.

केरळ काँग्रेसची भव्य तयारी

वायनाड जिल्हा काँग्रेस कमिटीने राहुल गांधींच्या स्वागतासाठी भव्य तयारी केली आहे. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता कलपेट्टा येथील बस स्टँड परिसरात त्यांच्या स्वागताचा भव्य कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी १२ वाजता नल्लूरनाडूमधील आंबेडकर मेमोरियल कॅन्सर सेंटरमध्ये एका टाय टेन्शन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करतील.

खासदारकी गेल्यानंतर गेले होते वायनाडला

याआधी राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर १० एप्रिलला ते वायनाड दौऱ्यावर गेले होते. या दरम्यान त्यांनी संसदेचे सदस्यत्व रद्द केल्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा