Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणगणपतीला कोकणात जाताय? तर ही बातमी वाचाच

गणपतीला कोकणात जाताय? तर ही बातमी वाचाच

मुंबई: गणेशोत्सव म्हटला की कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू होते. त्यातच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेने खुशखबर आणली आहे. कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी गणपती स्पेश गाड्यांच्या अधिक फेऱ्या जाहीर केल्या आहेत. यामुळे आता मोठ्या प्रमाणात चाकरमनी आपल्या कोकणातील आपल्या गावाला जाऊ शकतील.

याआधी पश्चिम रेल्वेने चाकरमान्यांसाठी गणपती स्पेशल ट्रेन्स जाहीर केल्या होत्या. त्यात रेल्वेने अधिक फेऱ्या वाढवल्याचे ठरवल्याने चाकरमान्यांची गावाला जाण्याची चिंता मिटली आहे. ज्यांना याआधीच्या रेल्वेचे तिकीट मिळाले नाही त्यांच्यासाठी ही बातमी खरंच आनंदाची आहे. यात उधना येथून मडगाव आणि मंगळुरूला जाणाऱ्या रेल्वे तसेच अहमदाबाद-कुडाळ या मार्गांवर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

या आहेत विशेष फेऱ्या

रेल्वेच्या या विशेष फेऱ्यांसाठी तिकीट काढण्याची मुभा १२ ऑगस्टपासून असेल. या नव्या घोषणेंतर्गत उधना-मडगाव स्पेशल रेल्वे उधना या ठिकाणाहून शनिवारी आणि बुधवारी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटणार आहे तर ती दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी मडगावला पोहोचेल.

तसेच अहमदाबाद-कुडाळ स्पेशतसेच ल ही गाडी अहदमबाद येथून दर मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी कुडाळ येथे पोहोचेल. ही गाडी १२ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीदरम्यान धावणार आहे. तसेच डाऊन मार्गावरील कुडाळ-अहमदाबाद स्पेशल ट्रेन कुडाळवरून दर बुधवारी सकाळी सहा वाजून ३० मिनिटांनी सुटेल तर ती दुसऱ्या दिवशी ३ वाजून ३० मिनिटांनी अहमदाबादला पोहोचेल. ही रेल्वे १३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत सुरू राहील. या प्रवासादरम्यान ही रेल्वे वडोदरा, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली , विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली आणि सिंधुदुर्ग या स्थानकांवर थांबेल.

तर उधना-मंगळुरू ही स्पेशल ट्रेन उधना येथून दर बुधवारी २० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १८.३०ला पोहोचेल. ही गाडी १३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत सुरू राहील. तर मंगळुरू-उधना ही रेल्वे मंगळुरू येथून दर गुरूवारी २०.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २०.००वाजता पोहोचले. ही गाडी १४ ते २८ सप्टेंबर या कालावधीत चालवली जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -