
'तिलक हुशार फलंदाज, पण विश्वचषकातील संधीबाबत माहिती नाही' रोहित शर्माचे वक्तव्य
भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता असून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मात्र याबाबत मौन बाळगले आहे. तिलक वर्मा हा हुशार फलंदाज आहे आणि त्याने काही डावांतच हे दाखवून दिले असल्याचे सांगत त्याला विश्वचषक स्पर्धेकरिता भारतीय संघात संधी मिळेल का? याबाबत मात्र रोहितने उत्तर देणे टाळले.
गुरुवारी झालेल्या ला लीगा स्पर्धेत रोहित शर्माने टीम इंडियाची विश्वचषक तयारी, नंबर ४ समस्या, सूर्यकुमार यादवचा वनडेतील फॉर्म यासह अनेक मुद्द्यांवर स्पष्ट उत्तरे दिली. मात्र तिलक वर्माबाबतच्या एका प्रश्नावर त्याने उत्तर देणे टाळले.
रोहित शर्मा म्हणाला की, मला तिलक वर्माच्या फलंदाजीमध्ये तो ज्या वयात आहे, त्यापेक्षा तो अधिक परिपक्व असल्याचे दिसते. त्याला त्याची फलंदाजी चांगल्या प्रकारे माहीत आहे. मी त्याच्याशी बोलतो तेव्हा मला कळते की, त्याला फलंदाजी चांगलीच समजते. कधी फटके मारायचे आणि कोणत्या वेळी फलंदाजी कशी करायची?, हे त्याला माहीत आहे. तो खूप शानदार आणि आश्वासक वाटला. पण मला एवढेच सांगायचे आहे की, मला विश्वचषकातील संधाबाबत माहिती नाही. पण तो खूप हुशार आहे आणि त्याने काही डावांतच हे दाखवून दिले असल्याचे रोहित म्हणाला.