Shivsena and BJP : धनुष्यबाण नव्हे, तर 'या' चिन्हावर निवडणूक लढवणार शिवसेना

काय आहे हा मास्टर प्लॅन?


मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Elections) एकहाती सत्ता आणण्याच्या दृष्टीने भाजपचे (BJP) जोरदार प्रयत्न सुरु आहेत. राज्यात अगोदरच शिवसेनेचे (Shivsena) तब्बल ४० आमदार सोबत आले आहेत. आता ‘राष्ट्रवादी’चेही (NCP) आमदार सोबत आल्याने भाजपला अधिक बळ मिळाले आहे. यातूनच भाजप दोन्ही निवडणुकांत आपले यशाचे मिशन फत्ते करण्याच्या तयारीला लागले आहे. त्यातच आता आणखी एका वृत्तामुळे भाजपला प्रचंड फायदा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीत ‘कमळ’ चिन्हावर लढणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.


शिवसेनेने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याबाबत ठाणे येथील रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये भाजपच्या नेत्यांची चिंतन बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्या ठिकाणी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे राज्यात लढविण्यात येणाऱ्या जागांबाबतही चर्चा झाली.



जळगाव जिल्हा आघाडीवर असणार


शिवसेनेने ‘कमळ’ चिन्हावर विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतल्यास त्यात जळगाव जिल्हा आघाडीवर असणार आहे. जळगाव जिल्ह्यातून तब्बल पाच आमदार शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे जळगाव ग्रामीणचे गुलाबराव पाटील, पारोळ्याचे चिमणराव पाटील, पाचोऱ्याचे किशोरआप्पा पाटील, चोपड्याच्या लताताई सोनवणे आणि मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे पाचही आमदार ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्याबाबतची सर्व रचना पूर्ण झाली असल्याचेही सांगण्यात आले आहे.



भाजपच्या इच्छुक उमेदवारांचे काय?


जळगावच्या पाच मतदारसंघांतून शिवसेनेने ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवली तर भाजपचे पाचोरा येथील अमोल शिंदे, पारोळा येथील करण पवार, तर जळगाव ग्रामीणमधील चंद्रशेखर अत्तरदे यांच्या तयारीचे काय? असा प्रश्‍नही निर्माण होतो. दरम्यान, पारोळा येथील करण पवार म्हणाले की, "पक्षवाढीचे कार्य करण्याचे आदेश पक्षाच्या वरिष्ठांनी दिले आहेत. त्यानुसार आम्ही कार्य करीत आहोत. आमच्या सोबत कुणी येत असेल आणि पक्ष बळकट होत असेल तर त्यांचे स्वागतच आहे." त्यामुळे भाजपतील इच्छुकांची निवडणुकीत नेमकी भूमिका काय, याकडेही लक्ष असेल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील (Mumbai) पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त

Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Mumbai Mayor Bungalow : महापौर बंगल्यासह परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामांची निविदा रद्द

महापौरांच्या निर्देशानानंतर प्रशासनाची कार्यवाही विरोधकांसह शिवसेनेनेही व्यक्त केली या खर्चावर

Property Tax Rules : ग्रंथालयांना आकारला जातो व्यावसायिक दराने कर

निवासी दर कर आकारण्याची महापालिकेकडे नगरसेवकाची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील ग्रंथालयांंना सध्या

BMC : महापालिका सभागृहासह समित्यांचे कामकाज पेपरलेस

सर्व नगरसेवकांना येत्या महिन्याभरात मिळणार टॅब मुंबई (सचिन धानजी) : मुंबइ महापालिकेतील कारभार पेपरलेस